ETV Bharat / state

लिफ्टमधे अडकल्यावर विजू मानेंची फेसबुकवर पोस्ट, महापौरांनी घेतली प्रशासनाची बैठक

चित्रपट दिग्दर्शक विजू माने ठाणे महापालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सोमवारी सकाळी एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी ते येथील लिफ्टमध्ये १० ते १५ मिनिटे अडकल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी माने यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत आपली व्यथा सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली आहे.

thane
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या लिफ्टमध्ये अडकले दिग्दर्शक विजू माने
author img

By

Published : Dec 2, 2019, 9:46 PM IST

ठाणे - नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ठाणे महापालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास चित्रपट दिग्दर्शक विजू माने नाट्यगृहाच्या लिफ्टमध्ये १० ते १५ मिनिटे अडकल्याची धक्कादायक घटना घडली. संबंधित बाब सुरक्षाकर्मींच्या लक्षात येताच त्यांनी माने यांना बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. यावेळी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना कसेबसे लिफ्टमधून सुखरूप बाहेर काढले. मात्र, या गंभीर प्रकरणी दिग्दर्शक विजू माने यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आपली व्यथा सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली आहे.

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या लिफ्टमध्ये अडकले दिग्दर्शक विजू माने

कोणत्या ना कोणत्या गोष्टीत नेहमीच चर्चेत असलेल्या ठाण्यातील हिरानंदानी मेडोज येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह हे आज एका वेगळ्याच बाबतीमुळे चर्चेत आले आहे. सोमवारी सकाळी आनंद विश्व गुरूकुल आणि महाविद्यालयाच्यावतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, चित्रपट दिग्दर्शक विजू माने कार्यक्रमाला जात असताना काशिनाथ नाट्यगृहाच्या व्हीआयपी लिफ्टमध्ये अडकले. यावेळी अचानक झालेल्या या प्रकरणामुळे माने यांना धडकी भरली. त्यांनी आरडाओरडा केला असता बऱ्याच वेळानंतर नाट्यगृहाच्या सुरक्षाकर्मींनी त्यांना सुरक्षित बाहेर काढले. हा प्रकार एवढा गंभीर असून मी थोडक्यात बचावलो असल्याचे यावेळी माने यांनी सांगितले.

हेही वाचा - ठाण्यातील मेट्रोसाठीच्या वृक्षतोडीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाची व्हीआयपी लिफ्ट मुळातच गेल्या अनेक महिन्यांपासून खराब असून असे प्रकार अनेकवेळा घडल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे नाट्यगृहात येणाऱ्या एखाद्या व्हिआयपी किंवा सामान्य प्रेक्षकाचा जीव गेल्यावर ठाणे महानगरपालिका जागी होणार का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. खरेतर ठाण्यातील नाट्यगृहांवर ठाणे मनपा कोट्यावधी रुपये खर्च करत असते. मात्र, तरीही अशा घटना घडतात. त्यामुळे पालिका प्रशासन नाट्यगृहाबाबत किती गंभीर आहेत? हे स्पष्ट झाले आहे. काही महिन्यापूर्वीच अभिनेता सुमित राघवनने नाट्यगृहाच्या दुरवस्थेबद्दल ठाणे मनपाचे सोशल मीडियावर वाभाडे काढले होते. त्यानंतर झालेला हा प्रकार गंभीर असून पालिका प्रशासनाला कधी जाग येणार? असा सवाल केला जात आहे. दरम्यान, नाट्यगृह आणि दुरवस्था ही युती कधीच तुटणार नसून आज माझ्यावर हा जीवघेणा प्रसंग घडला आहे. मात्र, उद्या हा प्रसंग दुसऱ्या कोणावर उद्भवला तर, काय होईल सांगता येत नाही, असा सवाल करून सोशल मीडियावर पोस्ट टाकत मानेंनी ठाणे महापालिका आणि प्रशासनाचे वाभाडे काढले. घडलेल्या प्रकरणानंतर माने यांनी त्वरित पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना संदेश पाठवला. तर, आयुक्तांनी मी रजेवर असल्याचे सांगत रूजू झाल्यानंतर त्वरित यावर लक्ष देईन, असे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे माने यांनी सांगितले.

ठाण्यातील गडकरी रंगायतन असो किंवा डॉ.काशीनाथ घाणेकर नाट्यगृह असो असे प्रकार नेहमीच घडत असतात. तर, वारंवार तक्रार करून देखील कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. घडलेल्या या प्रकरणानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी त्वरित बैठक बोलावून संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. मात्र, 'तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो', असा मेलोड्रामा मुख्यालयात रंगल्याने याची एकच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

हेही वाचा - भिवंडी महापौर निवडणूक : कोणार्क आघाडीच्या सौदेबाजीमुळे काँग्रेसमध्ये फूट, तर भाजपही दावणीला!

Intro:लिफ्ट मधे अडकल्यावर विजू मानेची फेसबुक वर उद्विग्न पोस्ट
महापौरानी घेतली प्रशासनाची बैठक Body: नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ठाणे महापालिकेच्या डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास चित्रपट दिग्दर्शक विजू माने घाणेकरच्या लिफ्टमध्ये 10 ते 15 मिनिटं अडकल्याची धक्कादायक घटना घडली असून मोठी दुर्घटना यानिमित्ताने टळली आहे. यावेळी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना कसेबसे लिफ्ट मधून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र या गंभीर प्रकरणामुळे दिग्दर्शक विजू माने यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आपली व्यथा सोसिअल मीडियाच्या माध्यमातून मांडली आहे.
कोणत्या ना कोणत्या गोष्टीत नेहमीच चर्चेत असलेल्या ठाण्यातील हिरानंदानी मेडोज येथील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह हे आज एका वेगळ्याच बाबतीमुळे चर्चेला आले आहे. सोमवारी सकाळी आनंद विश्व गुरूकूल आणि कॉलेजच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी चित्रपट दिग्दर्शक विजू माने कार्यक्रमाला जात असताना काशिनाथ नाट्यगृहाच्या व्हीआयपी लिफ्ट मध्ये अडकले होते. यावेळी अचानक झालेल्या या प्रकरणामुळे विजू माने यांना धडकी भरल्याने त्यांनी आरडाओरडा केला असता ब-याच वेळा नंतर नाट्यगृहाच्या सुरक्षाकर्मिंनीच त्यांना सुरक्षित बाहेर काढले. हा प्रकार एवढा गंभीर असून मी थोडक्यात बचावलो असल्याचे यावेळी माने यांनी सांगितले. डाॅक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाची व्हीआयपी लिफ्ट मुळातच गेल्या अनेक महिन्यांपासुन खराब आहे असा प्रकार अनेकदा घडलाय अशी माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे नाट्यगृहात येणा-या एखाद्या व्हिआयपी किंवा सामान्य प्रेक्षकाचा जीव गेल्यावर ठाणे महानगर पालिका जागी होणार का? असा प्रश्न आता विचारला जातोय, खरं तर ठाण्यातील नाट्यगृहांवर ठाणे मनपा कोट्यावधी रुपये खर्च करते पण तरीही अशा घटना घडतात त्यामुळे पालिका प्रशासन नाट्यगृहा बाबत किती गंभीर आहेत हे स्पष्ट झाले आहे. काही महिन्यांपूर्वीच अभिनेता सुमित राघवन ने नाट्यगृहाच्या दुरावस्थेबद्दल ठाणे मनपाचे सोशल मिडायावर वाभडे काढले होते. झालेला प्रकार गंभीर असुन पालिका प्रशासनाला कधी जाग येणार असा सवाल केला जाऊ लागला आहे. दरम्यान नाट्यगृह आणि दुरवस्था ही युती कधीच तुटणार नसून आज माझ्यावर आलेला जीवघेणा प्रसंग घडला उद्याचे मला माहित नाही असा सवाल विजू माने यांनी करीत सोसिअल मीडियावर ठाणे महापालिका आणि प्रशासनाचे वाभाडे काढले. घडलेल्या प्रकरणानंतर विजू माने यांनी त्वरित पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना संदेश पाठवला असून आयुक्तांनी मी रजेवर असल्याचे सांगत रुजू झाल्यानंतर त्वरित यावर लक्ष देईन असे आश्वासन दिले असल्याचे माने यांनी सांगितले. 
  ठाण्यातील गडकरी रंगायतन असो किंवा डॉ.काशीनाथ घाणेकर नाट्यगृह असो असे प्रकार नेहमीच घडत असतात. वारंवार तक्रार करून देखील कोणत्याही उपाययोजना केल्याजात नाहीत. घडलेल्या या प्रकरणानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी त्वरित बैठक बोलवून संबंधित अधिकाऱ्यांचे कानउघाडणी केली. मात्र तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो असा मेलो ड्रमा मुख्यालयात रंगल्याने याची एकच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

  BYTE - नरेश म्हस्के ( महापौर,ठाणे महानगर पालिका )  

राम रेपाळे ( स्थायी समिती सभापती )
BYTE - विजू माने ( दिग्दर्शक )Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.