ठाणे - माध्यमांनी एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्याविषयी विचारले असता, देवेंद्र फडणवीस यांनी हात जोडत या प्रश्नाला बगल देत निघून गेले. एकनाथ खडसे यांनी त्यांची नाराजी कायमच व्यक्त केली आहे. त्याविषयी माध्यमांमध्ये चर्चाही झाल्या. त्यावरूनच फडणवीसांना प्रश्न विचारला असता, ते उत्तर न देताच मुंबईला रवाना झाले.
हेही वाचा - 'गरज पडल्यास सेना-राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सोबत घेऊ'
ठाण्यातील कोपरी येथे न्यू गावदेवी भाजी मार्केट आणि तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने मार्गशीर्ष महिन्यात जनकल्याणार्थी सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुडीय महायज्ञाचे आयोजन करण्यात येते. यावेळी देवेंद्र फडणवीस ठाण्यात आले होते. यावेळी माध्यमांनी या संदर्भात एकनाथ खडसेंच्या विषयावर छेडले असता फडणवीस यांनी हात जोडून तिथून निघून गेले.
हेही वाचा - मुंबईत बनावट विमा पॉलिसी विकणाऱ्या 9 जणांची टोळी जेरबंद
राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मनाली संदीप कुलकर्णी यांच्या पाणी शुद्ध करण्याच्या पारंपरिक पद्धती प्रोजेक्ट बेस्ट क्रिएटिव्ह चाईल्डला 25 हजार रुपयांचा धनादेश माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते देण्यात आला. तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत भाजप सरकार आणि फडणवीस यांचा सिंधी समाजाकडून सत्कार करण्यात आला.