ETV Bharat / state

Devendra Fadnavis On Opposition : आर आर पाटलांचे बोलणे हेरले, म्हणून कपिल पाटलांना चोरले; फडणवीसांची जोरदार फटकेबाजी - दिवंगत नेते आर आर पाटील

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी भव्य किक्रेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मैदानासह भाषणातून जोरदार फटकेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधला.

Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Mar 6, 2023, 10:41 AM IST

ठाणे : केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील हे राष्ट्रवादीत असतांना, त्यांना एका भाषणात उद्देशून दिवंगत आर आर पाटील म्हणाले होते की, येणाऱ्या काळात कपिल पाटील यांचे नाव खूप गाजणार आहे. त्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. त्यावर एकाच हशा पिकला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटीलांच्या काही शब्दांची पूनरूच्चार केला. आर आर पाटीलांचे बोलणे हेरले, म्हणून कपिल पाटीलांना त्यांच्या पासून चोरले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कपिल पाटलांच्या गोलंदाजीवर फडणवीसांची फटकेबाजी : केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त अंजूर गावातील मैदानात भव्य किक्रेट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या उत्तम क्रिकेटपटूंना २३ बाईक, एक कार आणि इतरही लाखोंचे बक्षीस ठेवण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनाही किक्रेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे फडणवीस मौदनात बॅट घेऊन उतरल्यानंतर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या गोलंदाजीवर फडणवीस यांनी जोरदार चौफेर फटकेबाजी केली.

केकवर तुटून पडली बच्चे कंपनी : स्पर्धेआधी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थित मंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचा भलामोठा केक मैदानात कापण्यात आला. हा केक केंद्रीय पंचायत राज विभागाच्या पाणी योजनेसह येणाऱ्या काळात भिवंडीतील आरखडा कसा असेल, असा पाच बाय चार फुटाचा केक होता. एकीकडे मैदानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस चौफेर फटकेबाजी करत असतानाच, दुसरीकडे बच्चे कंपनी त्या भल्यामोठ्या केकवर तुटून पडली होती. काही वेळात संपूर्ण केक बच्चे कंपनीने फस्त केला.

टोमण्यांवर प्रतिक्रिया देणे मी योग्य समजत नाही : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटाच्या शिवसेनेवर सकडून टीका केली. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार करत उद्धव ठाकरेंचे भाषण हाताश करणारे होते. अशा भाषणावर, टोमण्यांवर कुठलीही प्रतिक्रिया देणे योग्य समजत नाही. असे बोलून त्यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली. तेच शब्द, तीच वाक्य, तेच टोमणे, काही नवीन या सभेमधून मिळाले नाही म्हणजे त्यांच्या नाकाखालून 40 आमदार निघून गेल्याचा संताप आणि निराशा या दोन्ही गोष्टी त्यांच्या भाषणामध्ये पहायला मिळाल्या असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : Navneet Rana Dance: मेळघाटात होळीच्या पर्वावर राणा दाम्पत्याने आणलीत रंगत, रवी राणा यांनी वाजवले ढोल

कपिल पाटीलांच्या गोलंदाजीवर फडणवीसांची फटकेबाजी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.