ठाणे : एका त्रिकोणी प्रेम संबंधाचा भयानक अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली असून प्रेयसी समोरच भर रस्त्यात एका प्रियकराने दुसऱ्या प्रियकराच्या छातीत धारदार चाकू भोसकून ठार (Despicable murder in Kalyan) केले. ही घटना कल्याण पूर्वेतील खडेगोळवली मधील मुख्य रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून आरोपी प्रियकरासह त्याच्या तीन मित्राविरोधात खुनाचा (Despicable murder) गुन्हा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. ललित संतोष उज्जेनकर (वय २२, रा. खडेगोळवली) असे खून करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. तर आदित्य सुरेश बर (वय २१ रा. मानखुर्द, मुंबई ) असे निर्घृण हत्या झालेल्या प्रियकराचे नाव आहे. (Thane Crime)
काय आहे प्रकरण : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार किरण सोनावणे (वय,१९ रा. दिवा ) हिची आई कल्याण पूर्वेतील आत्माराम नगर, खडेगोळवली परिसरात राहते. मात्र, गेल्या चार वर्षांपासून किरणही मोठा भावाच्या घरी राहत आहे. त्यापूर्वी ती आईकडे राहत असताना आरोपी ललित सोबत तिचे प्रेमसंबंध जुळून आले. मात्र आरोपी प्रियकर काही कामधंदा करत नसून दारूसह अन्य व्यसन करीत असल्याने प्रेयसीने त्याच्याशी प्रेम संबध दीड वर्षापासून तोडले. त्यानंतर मानखुर्द पश्चिम भागातल्या अण्णाभाऊ साठेनगरमध्ये राहणाऱ्या मृतक आदित्य सोबत २०२१ साली प्रेमसंबंध जुळले, विशेष म्हणजे मृत प्रियकर हा किरणच्या मोठा भावाचा मित्र असल्याचे त्याचे दिवा येथील घरी येणेजाणे होते. त्यातच दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती पहीला प्रियकर ललीत यास माहीत झाली होती. त्या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी ललीत याने मृत आदित्य बरोबर फोन वरून भांडण केले होते. मात्र त्यावेळी त्यांचेत समझोता झाला होता. परंतु त्याचा राग आरोपी ललीत याने मनात धरला होता.
दोघांमध्ये झाला वाद : भावाकडे राहत असताना एक कुत्र्याचे पिल्लू प्रेयसी किरणने पाळले असून त्याचे नाव ‘हनी’ ठवेले. याच दरम्यान किरणच्या वहीनीची ८ महीन्यापुर्वी प्रसूती झाल्याने घरात लहान बाळ असल्याने वहीनीने आरोपी ललीत यास संपर्क करून त्याचे कडे या कुत्र्याचे पिल्लु संभाळण्यासाठी दिले होते. त्यानंतर ४ एप्रिल रोजी मृत प्रियकर आदित्य हा दिवा येथील घरी आला होता. त्यावेळी मृत आदित्य याने प्रेयसीचा मोबाईल पाहीला असता त्यामध्ये पायल या नावाने सेव असलेल्या मोबाईल नंबरच्या व्हॉटसप डीपीवर आरोपी ललीत याचा फोटो दिसला व तो पाहुन आदित्य यास पायल या नावाने सेव असलेला नंबर ललीतचा असल्याचे समजले. यामुळे आदित्य आणि किरणमध्ये वाद झाला. दरम्यान, ललीत सोबत काहीएक संबंध नाही फक्त त्याचेकडे संभाळण्यासाठी दिलेले कुत्र्याचे पिल्लाची माहीती घेण्यासाठी संपर्कात आहे, असे तिने सांगीतले होते. तरी देखील मृत अदित्य याची खात्री होत नसल्याने त्याचवेळी प्रेयसीने पहिला प्रियकर ललीत याला फोन लावुन संबंध स्पष्ट करण्यासाठी संपर्क केला. परंतु त्या दिवशी आरोपी ललीत याने फोन उचलला नाही.
प्रेम प्रकरणावरून संशय : दरम्यान, ७ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास आरोपी ललीत याने किरणला तू आदित्यचे फोनवरून फोन का केले होते? असे विचारून तु आदित्यला दिव्याला बोलावुन घे मी तिकडे येतो, असे ललीत बोलत असतानाच, तिघेही कॉन्फरन्स वर घेवून फोनवर बोलत होते. त्यावेळेस आरोपी ललीत हा मृत आदित्य बरोबर फोनवर शिवीगाळी करून तुझ्या मुळे माझे किरण सोबत असलेले प्रेम संबंध तुटले असे बोलून वाद घालत होता. त्यानंतर मृत आदित्य याने किरणला सांगीतले कि, कुत्र्याचे पिल्लामुळे तु ललीत सोबत संपर्कात आहे. तर आपण कुत्र्याचे पिल्लू इकडे घेवुन येवु त्यामुळे त्याचे बरोबर संपर्क होणार नाही. परंतु ललीत हा कुत्र्याचे पिल्लु देण्यास तयार नव्हता. तर आरोपी ललितने तीन मित्रासह दिवा येथील घरी येऊन त्याने वारंवार मला कॉल करू नका, मी डीप्रेशन मध्ये आहे. मी कुत्र्याचे पिल्लू देणार नाही, असे सांगत होता. मात्र किरणच्या वहीनीने आरोपी ललीतकडे विनंती करत सांगितले कि, दोन महिन्यासाठी कुत्र्याचे पिल्लु आमचे कडे दे, त्यामुळे आरोपी ललीतने कुत्र्याचे पिल्लु देण्यास तयार झाला.
अशी केली हत्या : ७ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास मृत आदित्य हा प्रेयसीसोबत कुत्र्याचे पिल्लू घेण्यासाठी येऊन खडेगोळवली भाजी मार्केटच्या मेन रोडवर आरोपी ललित कुत्र्याचे पिल्लू घेऊन जाण्यासाठी वाट पाहत होते. त्याच सुमाराला आरोपी ललित या दोघांना भेटला आणि कुत्र्याचे पिल्लू घरून घेऊन येतो, असे सांगून गेला. पिल्लू घेऊन जाण्यासाठी प्रेयसीने ओला रिक्षाही बुक केली असता, आरोपीचा मित्र नकुल याने बहाणा करून किरणला आरोपी ललितच्या आईनं घरी बोलवल्याचे सांगून तिला घेऊन गेला. त्याच सुमारास आदित्यवर घात लावून बसलेला आरोपी ललितने तीन मित्रांच्या मदतीने भर रहदारीच्या रस्तातच बेदम मारहाण करत होता. तर त्याचा आरडाओरड ऐकून आदित्यला वाचविण्यासाठी प्रेयसी किरण येताच आरोपीने आदित्यच्या छातीत धारदार चाकू भोसकून घटनास्थळावरून पळ काढला.
तीन आरोपी फरार : दुसरीकडे रक्ताच्या थारोळ्यात पडललेल्या आदित्यला उल्हासनगरमधील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, येथील डॉक्टरने तपासून मृत घोषित केले. कोळसेवाडी पोलिसांनी चार आरोपी पैकी एका आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे. तर इतर तीन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.