ETV Bharat / state

Unauthorized Construction in KDMC : केडीएमसीतील अनधिकृत बांधकामाच्या माहेरघराचा प्रश्न; अर्थसंकल्पीय अधिवेशनात चौकशीची मागणी

अर्थसंकल्पीय अधिवेशनात केडीएमसीतील अनधिकृत बांधकामाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. याप्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अधिवेशनात दिली आहे.

Unauthorized Construction in KDMC
केडीएमसीतील अनधिकृत बांधकाम
author img

By

Published : Mar 24, 2023, 3:24 PM IST

Updated : Mar 24, 2023, 4:02 PM IST

आमदार राजू पाटील सभागृहात बोलताना

ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत गेल्या २० वर्षांपासून अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांनी सपाटा लावल्याने अनधिकृत बांधकामाचे माहेरघर अशी ओळख या शहरांची निर्माण झाली. त्यातच बनावट कागदपत्रांच्याद्वारे मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक करून बेकायदा इमारती उभारल्या आहे. या संदर्भात मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याकडे उच्चस्थरीय चौकशीची मागणी देखील केली होती. आज शुक्रवारी हा प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित झाल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितल्याने भूमाफियांचे धाबे दणाणणे आहे.

उच्चस्थरीय चौकशीची मागणी : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या शाळा, क्रीडांगण आणि आदी आरक्षित जागांवर अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात उभारली आहे. अनेक ठिकाणी अधिकृत बांधकामांची बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्तनोंदणी देखील करण्यात आली आहे. यामध्ये टोकन घोटाळा देखील समोर आला होता. त्यावेळीच मनसे आमदार प्रमोद(राजू) पाटील यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना लेखी पत्र देऊन उच्चस्थरीय चौकशी करण्याची मागणी केली होती.

चौकशीसाठी समिती गठीत : अनधिकृत बांधकाम प्रकरणात चौकशी देखील सुरु आहे. दरम्यान, यामध्ये फक्त काही ठराविक उद्योजकांची चौकशीच केली जात आहे. मात्र, या अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होत. मात्र, या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून संबंधित प्रश्नी विधानसभेत भाजप आमदार गणपत गायकवाड, मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील आवाज उठवला आहे. यावर मंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून दोषी अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

पालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे माहिती देताना

विकासकांनी केली रेराची फसवणूक : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. मात्र वारंवार पत्रव्यवहार करून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आवाज उठवून देखील कारवाई होत नसल्याने शुक्रवारी हा विधानसभेत मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. कल्याण डोंबिवलीमध्ये 65 विकासकांनी रेराची फसवणूक केली आहे. यामध्ये फक्त वास्तुविशारद आणि जमीन मालकांना दोषी धरण्यात आले आहेत. मात्र, या बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांवर महापालिकेने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. त्यामुळे हा प्रश्न आमदार राजू पाटील आणि गणपत गायकवाड यांनी विधानसभेत मांडल्यानंतर अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करणार असल्याचे मंत्र्यांनी जाहीर केले आहे.

चौकशी करून कारवाई होणार : कल्याण शीळ रस्त्यावरील पलावा चौकात एमएमआरडीएच्या उड्डाणपुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. आणि हे बांधकाम एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीवर करण्यात आले आहे. यामध्ये अनधिकृत हॉटेल्स आणि वाईन शॉप सुरु आहेत. या बाबत न्यायालयाने देखील आदेश दिले आहेत. या संदर्भात वारंवार सांगून देखील अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने या प्रकरणी देखील अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई होणार आहे. या बांधकामांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून उड्डाणपुलाचे काम देखील रखडले आहे.

अनधिकृत बांधकामांची यादी : उल्हासनगर शहरातील अनधिकृत इमारतींवर नव्वदच्या दशकात कारवाई करण्यात आली होती. यामध्ये इमारतींचे स्लॅब तोडण्यात आले होते. मात्र, पिलर तोडले नसल्याने त्या इमारतींमध्ये दुरुस्ती करून नागरिकांनी वास्तव्यास सुरुवात केली होती. मात्र आता या इमारतीचे स्लॅब कोसळू लागले आहेत. अशीच परिस्थिती काही काळखंडात कल्याण डोंबिवली परिसराची होणार आहे. महापालिकेकडून दररोज अनधिकृत बांधकामांची यादी प्रसिद्ध होते. कारवाई देखील करण्यात येते. मात्र कारवाईत इमारतीचे मधील स्लॅब तोडले जात असून पिलर तोडले जात नाहीत. त्यामुळे या इमारतींचे स्लॅब दुरुस्त करून इमारती पुन्हा उभारल्या जात आहेत.

कारवाईसाठी पाठपुरावा करणार : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील या सर्व अनधिकृत बांधकामांना प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करणार का ? असा प्रश्न मनसे आमदार राजू पाटील तसेच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी उपस्थित केला होता. आता मंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार असल्याचे सांगितले आहे. या संदर्भात पुन्हा एकदा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणी पाठपुरावा करून दोषी अधिकाऱ्यांवर देखील कारवाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : Hasan Mushrif ED Summoned : आमदार हसन मुश्रीफांची आज होणार पुन्हा चौकशी; ईडीने बजावले समन्स

Last Updated : Mar 24, 2023, 4:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.