ETV Bharat / state

ठाण्यात अज्ञात गरोदर महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ - अज्ञात गरोदर महिलेचा मृतदेह

ठाण्यात अप व डाऊन रेल्वे मार्गाच्या मध्यभागी अज्ञात गरोदर महिलेचा मृतदेह सापडला. या महिलेचा धावत्या गाडीतून पडून किंवा गाडीचा धक्का लागून मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

कल्याण लोहमार्ग पोलीस
author img

By

Published : Sep 25, 2019, 8:30 PM IST

ठाणे - उल्हासनगर ते विठ्ठलवाडी दरम्यान अप व डाऊन रेल्वे मार्गाच्या मध्यभागी अज्ञात गरोदर महिलेचा मृतदेह सापडला. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

अज्ञात व्यक्तीने मंगळवारी रात्री रेल्वे नियंत्रण कक्षात फोन करून एक महिला धावत्या गाडीतून पडून जखमी झाल्याची माहिती दिली. ही माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश देवरे यांना मिळताच ते घटनास्थळी गेले. २५ ते ३० वर्षीय वयोगटातील एक गरोदर महिला पडलेली दिसली. तिच्या चेहरा व डोक्याच्या मागे जखमा आणि डावा पाय फॅक्चर झालेला होता. जखमी महिलेला उपचारासाठी मध्यवर्ती रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या महिलेजवळ ओळख पटावी, अशी कोणतीच वस्तू पोलिसांना मिळाली नाही. त्यामुळे तिची ओळख पटणे कठीण झाले आहे.

हेही वाचा - प्रेम प्रकरणात आडवा येणाऱ्याचा चिरला गळा, प्रियकरासह तिघांना अटक

अज्ञात महिलेचा धावत्या गाडीतून पडून किवा गाडीचा धक्का लागून मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृत महिला ही ६ ते ७ महिन्याची गरोदर होती. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश देवरे करत आहेत.

Intro:kit 319Body:गरोदर अज्ञात महिलेचा मृतदेह रेल्वे रूळालगत आढळल्याने खळबळ

ठाणे : उल्हासनगर ते विठ्ठलवाडीच्या दरम्यान अप व डाऊन रेल्वे मार्गाच्या मध्यभागी उताण्या व जखमी स्थितीत २५ ते ३० वयोगटाच्या गरोदर अज्ञात महिलेचा मृतदेह कल्याण लोहमार्ग पोलिसांना मिळून आला आहे. हा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

कोणीतरी अज्ञात इसमाने मंगळवारी रात्री साडे ९ च्या सुमारास रेल्वे कंट्रोलला फोन करून उल्हासनगर ते विठ्ठलवाडीच्या दरम्यान अप व डाऊन रेल्वे मार्गावर कोणतीतरी महिला धावत्या गाडीतून पडून जखम झाल्याची माहिती दिली. ती माहित कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पो.नि.योगेश देवरे यांना मिळताच ते पो.शि.माने, महिला हेड.कॉ. कांबळे यांच्यासह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी २५ ते ३० वर्षीय वयोगटातील एक गरोदर महिला उताण्या स्थितीत पडलेली होती. तिच्या चेह-यावर व डोक्याच्या मागे जखमा झालेल्या होत्या. याशिवाय तिचा डावा पाय फॅक्चर झालेला होता. त्या जखमी महिलेला उपचारासाठी मध्यवर्ती रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. त्या महिलेजवळ तिची ओळख पटावी अशी कोणतीच वस्तू पोलिसांना मिळाली नसल्याने तिची ओळख पटणे मुश्किल झाले आहे.
त्या अज्ञात महिलेचा धावत्या गाडीतून पडून किंवा गाडीचा धक्का लागून ती मयत झाली असाव असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्या महिलेने अंगात काळा व निळया कलरचा कुडता, काळया ओढणीसह घातला असून त्या अनोळखी महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास कल्याण लोहमार्ग पोलिस ठाणे व पोलिस निरीक्षक योगेश देवरे, मोबाईल नं. ९४०४८५४४३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलाांनी केले आहे. मृतक महिला ही ६ ते ७ महिन्याची गरोदर होती. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मत मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली असून अधिक तपास पो.नि.योगेश देवरे करत आहेत.

Conclusion:kalyan
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.