ETV Bharat / state

टिटवाळा रेल्वे स्थानकातील धोकादायक पादचारी पूल सोमवारपासून बंद - titwala bridge

टिटवाळामधील रेल्वे प्रवाशांना पूर्व आणि पश्चिमेला जाण्यासाठी हा एकमेव पादचारी पूल आहे. अचानक गर्दी वाढल्यास यातून फार मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता होती. रेल्वे प्रवासी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधींनी वारंवार ही बाब रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती.

bridge
टिटवाला रेल्वे स्थानकातील धोकादायक पादचारी पूल सोमवारपासून बंद
author img

By

Published : Feb 9, 2020, 10:00 PM IST

Updated : Feb 9, 2020, 10:23 PM IST

ठाणे - टिटवाळा स्थानकातील ४० वर्ष जुना जीर्ण प्रवासी पूल सोमवारपासून कायमस्वरुपी बंद करण्यात येणार आहे. विविध रेल्वे प्रवासी संघटनांनी हा पूल बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला.

टिटवाळा रेल्वे स्थानकातील धोकादायक पादचारी पूल सोमवारपासून बंद

हेही वाचा - 'जास्त नाटकं कराल तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल'

टिटवाळामधील रेल्वे प्रवाशांना पूर्व आणि पश्चिमेला जाण्यासाठी हा एकमेव पादचारी पूल आहे. अचानक गर्दी वाढल्यास यातून फार मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता होती. रेल्वे प्रवासी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधींनी वारंवार ही बाब रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणुन दिली होती.

हेही वाचा - कोरोना विषाणू : आई-मुलीचा भावूक क्षण, हवेत मारली मिठी

दरम्यान, या स्थानकातील नवीन पूल नुकताच पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलामध्ये अनेक तृटी असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. हा पूल अरुंद असून गर्दी वाढल्यास चेंगराचेंगरी होऊ शकते, अशी भीती प्रवाशांनी व्यक्त केली. या नवीन पुलावर तिकीट खिडकीसह इंडिकेटर, लिफ्ट बसवण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. एक आणि दोन नंबर प्लॅटफॉर्मवर उतरणारा जिना हा मोटरमनच्या डब्याजवळ न उतरविता महिला डब्याजवळ उतरविण्यात यावा, अशी मागणीही स्थानिक करत आहेत.

Intro:kit 319Body:टिटवाळा रेल्वे स्थानकातील धोकादायक पादचारी पूल उद्यापासून बंद

ठाणे : टिटवाळा स्थानकातील जुन्या पादचारी पुलाची दुरावस्था झाल्यानंतर तसेच विविध रेल्वे प्रवाशी संघटनेच्या मागणीनुसार ४० वर्षापेक्षा अधिक वर्ष असलेला आणि जीर्ण झालेला धोकादायक प्रवासी पूल हा उद्या दुपारपासून कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
टिटवाळा रेल्वे प्रवाश्यांना पूर्व अथवा पश्चिमेला जाण्यासाठी एकमेव हा पाचदरी पूल आहे. तसेच अन्य कुठलाही पर्यायी पूल या ठिकाणी नव्हता. अश्यावेळी अचानक गर्दी वाढल्यास यातून फार मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता होती. या सबंधी येथील रेल्वे प्रवासी संघटना , समाजिक कार्यकर्ते , स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी वारंवार रेल्वे प्रशासनाच्या ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर अखेर नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन नुकताच हा पूल पादचा-र्यांसाठी खुला करण्यात आला आहे.
मात्र नव्याने उभारण्यात आलेला पादचारी पूल हा जरी प्रवाशांसाठी खुला करण्यात आला . मात्र पुलाच्या काही भागात त्रुटी असल्याचे रेल्वे प्रवाशांकडून सांगण्यात येते. तर टिटवाळा पूर्वेकडे नांदप दिशेकडून येणाऱ्या प्रवाश्यांना तिकीट काढण्यासाठी पुन्हा वळून मागे हेलपाटे मारून यावे लागते त्यासाठी नवीन पुलावर तिकीट खिडकी सुरु करण्यात यावी, प्रवाश्यांना सोयीस्कररीत्या दिसेल अश्या पद्धतीने इंडिकेटर लावणे, तसेच एक आणि दोन नंबरवर उतरणारा जिना हा मोटरमनच्या पहिल्याच डब्याच जवळ न उतरविता तो महिलाडब्याजवळ उतरविण्यात यावा जेणेकरून महिला प्रवासी यांना ते सोयीचे ठरेल त्याचबरोबर गाडीतून उतरणारे प्रवासी रेल्वे ट्रक न ओलांडता जास्तीत जास्त या पुलाचा वापर करता येईल. . त्याचबरोबर पूर्वेकडे लिफ्टची सुविधा प्रस्तावित असून अद्यापही ती देण्यात आलेली नाही. अश्या काही बाबींमुळे येथून ये-जा करणे हे प्रवाश्यांना यामुळे काहीअंशी त्रासदायक ठरणार असल्याचे मत येथील समाजिक कार्यकर्ते विवेकानंद कानेटकर यांनी सांगितले आहे.
टिटवाळा येथील गणेश मंदिरामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध अश्या यात्रास्थान असलेल्या या मंदिरात गणेशाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक या ठिकाणी दररोज येत असतात, तसेच मुंबईतून स्थलांतरीत झालेली आणि नव्याने घर घेणारी अनेक कुटुंब यांची संख्या दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत आहे. सध्या या ठिकाणी रेल्वेकडून नवीन पूल बांधण्यात आला. मात्र हा पूल गर्दीच्या तुलनेत अरुंद असल्याने ऐन गर्दीच्यावेळी याठिकाणी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परळ स्टेशन आणि एलफिन्स्टन स्टेशन यांना जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी होऊन २२ प्रवाशांचा मृत्यू किंवा मुंबई छत्रपती शिवाजी यांसारख्या घटनेची पुनरावृती होवू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता प्रवासी वर्गातून जोर धरत आहे.
दरम्यान, जुना पूल बंद होण्याबाबत येथील रेल्वे स्टेशन प्रबंधक दुर्गाशरण शुक्ला यांना विचारले असता जुना पादचारी पूल हा प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उद्या दुपारपासून कायमस्वरूपी बंद होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Conclusion:titvala
Last Updated : Feb 9, 2020, 10:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.