ETV Bharat / state

ठाण्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर; अडीच लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे वास्तव्य - धोकादायक इमारती

शहरात नेमक्या किती धोकादायक इमारती आहेत? तसेच या धोकादायक इमारतींमध्ये किती कुटुंबीयांचे वास्तव्य आहे? याची माहिती घेण्यासाठी ठाणे महापालिकेने मे महिन्यात सर्व्हेक्षण केले होते. यामध्ये ४ हजार ५०७ इमारती या संपूर्ण शहरात धोकायदाक असल्याचे समोर आले आहे.

धोकादायक इमारती
author img

By

Published : Jun 26, 2019, 8:01 AM IST

Updated : Jun 26, 2019, 10:24 AM IST

ठाणे - शहरात पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाणे महापालिकेने धोकादायक इमारतींचे मान्सूनपूर्व सर्व्हेक्षण केले आहे. त्यानुसार तब्बल अडीच हजार लाखांपेक्षा अधिक नागरिक धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करीत असल्याचे उघड झाले आहे. एकूण लोकसंख्येच्या १० टक्के नागरिक या इमारतींमध्ये राहत आहेत, तर गेल्यावर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी आहे.

धोकादायक इमारतींबद्दल बोलताना परिसरातील नागरिक

शहरात नेमक्या किती धोकादायक इमारती आहेत? तसेच या धोकादायक इमारतींमध्ये किती कुटुंबीयांचे वास्तव्य आहे? याची माहिती घेण्यासाठी ठाणे महापालिकेने मे महिन्यात सर्व्हेक्षण केले होते. यामध्ये ४ हजार ५०७ इमारती या संपूर्ण शहरात धोकायदाक असल्याचे समोर आले आहे. यापैकी जवळपास २०० इमारती या राहण्यास अत्यंत धोकादायक आहेत. या इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांची संख्या ५६ हजार ५२२ आहे. म्हणजेच अद्यापही अडीच लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे वास्तव्य धोकादायक इमारतींमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी नागरिकांना क्लस्टर योजनेमध्ये सामावून घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

शहरातील ४ हजार ५०७ धोकादायक इमारतींमध्ये ३ हजार ९९८ इमारती या अनधिकृत आहेत. केवळ ५०९ धोकादायक इमारती या अधिकृत असल्याचे या सर्व्हेमधून समोर आले आहे. विशेष करून दिवा, मुंब्रा आणि कळवा भागात धोकादायक इमारतींचे प्रमाण जास्त आहे. तसेच याठिकाणी कुटुंबीयांची संख्या देखील जास्त आहे. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने एका महिन्यात १२२ धोकादायक इमारती रिकाम्या करण्यात आल्या. 'सी १' या धोकादायक श्रेणीत असलेल्या १०३ इमारतींमधील ९१ इमारती या रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत, तर १२ इमारती तोडण्यात आल्या आहेत. 'सी २ ए' श्रेणीमधील ९८ इमारती आहेत, तर 'सी २ बी'मध्ये २ हजार २९७ इमारती आहेत. या दोन्ही श्रेणीतील इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. 'सी ३' श्रेणीमध्ये २००९ इमारती असून त्यांची किरकोळ दुरुस्ती करावी लागणार आहे. काही इमारती अद्यापही रिकाम्या करण्याचे काम सुरू असल्याचे अतिक्रमण विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

अधिकृत धोकादायक इमारतींची संख्या - ५०९
अनधिकृत धोकादायक इमारतींची संख्या - ३ हजार ९९८

काय आहे धोकादायक इमारतींच्या श्रेणी -

  1. सी १ - या श्रेणीमधील इमारती अतिधोकादायक असून त्या राहण्यास योग्य नसतात. अशा इमारती तोडण्यात येतात. सध्या या इमारतींची संख्या १०३ आहे.
  2. सी २ ए - या इमारती दुरुस्त करण्यायोग्य असतात. दुरुस्ती झाल्यानंतर यामध्ये नागरिक पुन्हा वास्तव्य करू शकतात. अशा ९८ इमारती आहेत.
  3. सी २ बी - यामध्ये नागरिक वास्त्यव्य करीत असताना इमारतींची दुरुस्ती केली जाते. अशा २ हजार २९७ इमारती आहेत.
  4. सी ३ - या श्रेणीमध्ये इमारतींना किरकोळ दुरुस्तीची गरज असते. अशा एकूण २००९ इमारती आहेत.

Intro:ठाण्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर हजारो इमारतीमधील कुटुंबीय चिंतीतBody:ठाणे महापालिकेने केलेल्या धोकायदाक इमारतींच्या मान्सूनपूर्व सर्व्हेक्षणामध्ये तब्बल अडीज लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य असल्याचे उघड झाले आहे . ठाणे महापालिकेच्या हद्दीमधील एकूण लोकसंख्येच्या १० टक्के नागरिक हे धोकादायक इमारतींमध्ये राहत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची संख्या ८६ हजारांनी वाढली आहे . विशेष म्हणजे ८८ टक्के धोकादायक इमारती या अनधिकृत राहत आहे म्हणजेच एकूण ४ हजार ५०७ धोकादायक इमारती ठाणे ,मुंब्रा ,दिवा ,वागळे व इतर भागात असल्याची आकडे वारी समोर आली आहे .
शहरात नेमक्या किती धोकादायक इमारती आहेत आणि या धोकादायक इमारतींमध्ये किती कुटुंबियांचे वास्तव्य आहे याची माहिती घेण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने मे महिन्यात मान्सूनपूर्व धोकादायक इमारतींचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते . यामध्ये ४ हजार ५०७ इमारती या संपूर्ण शहरात धोकायदाक असून यापैकी जवळपास २०० इमारती या राहण्यास अत्यंत धोकादायक आहेत . या इमारतींमधील कुटुंबीयांची संख्या लक्षात घेतल्यावर ती ५६ हजार ५२२ इतकी असून याचाच अर्थ जवळपास अडीज लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे वास्तव्य अजूनही धोकादायक इमारतींमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे .तर या बाबत नागरिकांना क्लस्टर या योजने मध्ये सामावून त्यांना राहण्यास कधी पर्यंत मिळणार असा सवाल धोकादायक इमारतीत राहणारे करीत आहे .
( धोकादायक इमारतीतील नागरिक )
धोकादायक इमारतींमध्ये बहुतांश इमारती या अनधिकृत असून ४ हजार ५०७ धोकादायक इमारतींमध्ये ३ हजार ९९८ इमारती या अनधिकृत आहेत . केवळ ५०९ धोकादायक इमारती या अधिकृत असल्याचे या सर्व्हेमधून समोर आले आहे . विशेष करून दिवा, मुंब्रा आणि कळवा भागात धोकादायक इमारतींचे प्रमाण जास्त असून कुटुंबीयांची संख्या देखील जास्त आहे . ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने एका महिन्यात १२२ धोकादायक इमारती या रिकाम्या करण्यात आल्या आहेत . सी १ या धोकादायक श्रेणीत असलेल्या १०३ इमारतींमधील ९१ इमारती या रिकाम्या करण्यात आल्या असून १२ इमारती या तोडण्यात आल्या आहेत . तर १२ इमारतींमध्ये अजूनही कुटुंबियांचे वास्तव्य आहे . सी २ ए रिकामी करून संचारात्मक दुरुस्थी करणे - ९८ इमारत आहे . सी २ बी मध्ये रिकामी न करता संचारात्मक दुरुस्थी करणे - २२९७ इमारत आहे . सी ३ किरकोळ दुरुस्थी २००९ इमारत आहे . इमारती अजूनही रिकाम्या करण्याचे काम सुरु असल्याचे अतिक्रमण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे .
BYTE : अशोक बुरपुल्ले ( उपायुक्त ठा म पा )

अधिकृत धोकादायक इमारतींची संख्या : 509

अनधिकृत धोकादायक इमारतींची संख्या : 3,998

काय आहे धोकादायक इमारतींच्या श्रेणी -

सी १ - या श्रेणीमधील इमारती अतिधोकादायक असून त्या राहण्यास योग्य नसताना . या इमारती तोडण्यात येतात . -१०३ इमारत

सी २ ए - या इमारती दुरुस्त झाल्यानंतर यामध्ये नागरिक पुन्हा वास्तव्य करू शकतात . - ९८ इमारत

सी २ बी - यामध्ये नागरिक वास्त्यव्यास असूनही इमारतींची दुरुस्ती करू शकतात . - २२९७ इमारत

सी ३- या श्रेणीमध्ये ज्या इमारतींची किरकोळ दुरुस्ती आहे अशा इमारतींचा समावेश आहे . - २००९ इमारत
BYTE : ठाणेकर १,२
( धोकादायक इमारतीतील नागरिक ) Conclusion:
Last Updated : Jun 26, 2019, 10:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.