ETV Bharat / state

Dance Bar In Bhiwandi : ऑर्केस्ट्राच्या नावाखाली भिवंडीत रात्री उशिरापर्यंत डान्सबारची 'छमछम'.. व्हिडीओ व्हायरल

author img

By

Published : Mar 11, 2022, 3:57 PM IST

कोरोनातून आता कुठे तरी रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. दुसरीकडे भिवंडीत ऑर्केस्ट्राच्या नावाखाली रात्री उशिरापर्यंत डान्सबारची छमछम सुरु असल्याचे समोर आले ( Dance Bar In Bhiwandi ) आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला ( Bhiwandi Dance Bar Viral Video ) आहे.

छमछम
छमछम

ठाणे : भिवंडी महापालिका ( Bhiwandi Municipal Corporation ) हद्दीसह ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात येऊन रुग्ण संख्या शून्यावर आली आहे. त्यातच भिवंडीत पुन्हा ऑर्केस्टाबारच्या नावांखाली डान्सबार ( Dance Bar In Bhiwandi ) उशीरा पहाटेपर्यत सुरु असल्याचा व्हायरल व्हिडिओ ( Bhiwandi Dance Bar Viral Video ) दोन दिवसापासून सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलं असल्याचे दिसून आले आहे. हा व्हिडीओ नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका डान्सबारमधील असल्याचे समोर आले आहे.

ऑर्केस्ट्राच्या नावाखाली भिवंडीत रात्री उशिरापर्यंत डान्सबारची 'छमछम'.. व्हिडीओ व्हायरल

डान्सबार बनत आहेत गुन्हेगारीचे केंद्र

भिवंडीत ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सर्रास डान्सबार सुरू असून, अश्लील प्रकार सुरू असल्याचे अनेकदा पोलिसांच्या छापेमारीवेळी समोर आले आहे. शिवाय हे डान्स बार गुन्हेगारीचे केंद्र बनत आहेत. या ठिकाणी बारमध्ये नृत्य करणाऱ्या महिलांवर पैशांची उधळण करण्यासह अश्लील प्रकार सुरू असतात. याबाबत पोलिसांनी अनेकदा कारवाई केली आहे. एकीकडे राज्यातील डान्सबार बंदीबाबत २००५ साली राज्यातील तत्कालीन आघाडी सरकारने निर्णय घेतला होता. त्यानंतर २०१३ ला राज्य सरकारला यश आले होते. मात्र राज्य सरकारच्या डान्सबार बंदीच्या निर्णयाला बार असोसिएशनच्या वतीने सर्वेच्च न्यायालयापर्यत लढा देत, जानेवारी २०१९ रोजी डान्स बारवरील बंदी काही शर्थीवर हटविण्यात आली आहे. त्यामुळे भिवंडी महापालिका हद्दीसह ग्रामीण भागातील सुरु असलेल्या ऑर्केस्ट्रा बार व लेडीज सर्व्हिस बारमध्ये अनधिकृत छुप्या खोल्यांचे जाळे अधिकच पसरले.

भिवंडीत २३च्या जवळपास डान्स बार

भिवंडी महापालिका हद्दीसह ग्रामीण भागातील मुंबई – नाशिक महामार्गावर व गोदाम पट्यात सुमारे १९ च्या जवळपास डान्सबार आहे. त्यामध्ये लैला, देवदास, पारो, किनारा, सिंगर, लवली, बॉम्बे पेलेस, नाईट लव्हर्स, सपना, अप्सरा, ड्रीम लव्हर्स, सम्राट, सुकुर, शिल्पा, सिल्वर पेलेस, इन्जोय, डब्लूडब्लूएफ, आशीर्वाद, सिरोज, संगीत आदी डान्सबारचा समावेश आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक बार नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून, महापालिका हद्दीतील ४ डान्सबार पैकी २ डान्स बार धोकादायक इमारतीमध्ये सुरू आहे. मात्र भिवंडी पालिकेने यावर कारवाई केल्याचे दिसून येत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.