ठाणे - एकीकडे राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अटीशर्तीचे प्रयत्न करत आहे. परंतु राज्यात निर्बंध असताना सुद्धा उल्हासनगरमध्ये सर्रास डान्सबार सुरु आहे. कॅम्प ३ च्या १७ सेक्शन चौकात असलेल्या चांदणी डान्सबारवर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने अचानक छापा टाकत १७ बारबाला महिलांसहित वेटर आणि ४० ग्राहकांना ताब्यात घेतले आहे. मात्र या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
नृत्य करणाऱ्या बारबालांवर पैसे उडविताना पोलिसांची एन्ट्री
उल्हासनगर कॅम्प तीनच्या १७ सेक्सन चौकात वादग्रस्त चांदणी आर्केस्ट्रा बार आहे. याठिकाणी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गाण्यावर अश्लील नृत्य आणि जमिनीवर बसून बीभत्स नृत्य करतात आणि नृत्य करणाऱ्या बारबालांवर पैसे उडवतात, अशी माहिती उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांना मिळाली होती. त्या माहितीवरून उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने काल रात्री उशिराचांदणी डान्सबारवर अचानक छापा टाकला.
बारबालांच्या छुप्या खोल्या उधवस्त
चांदणी बारमधून १७ बारबाला अश्लील नृत्य करत असताना ताब्यात घेण्यात आले. तसेच १० ग्राहक आणि १३ बार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे चांदणी डान्सबारमध्ये अनधिकृत बांधकाम केलेल्या छुप्या खोल्यांमध्ये बारबाला महिलांना लपवण्यासाठी उपयोग केला जात होता. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेच्या वतीने त्या बारबालांना लपविणाऱ्या छुप्या खोल्या अनधिकृत बांधकाम विभागाच्या पथकाकडून उधवस्त करत कारवाई करण्यात आली होती. तसेच पोलिसांद्वाराही अनेकदा छापेमारी करून देखील बारमधील छमछम काही थांबताना दिसत नाही आहे.
हेही वाचा - 'तुला पप्पांनी बोलावले' म्हणून अल्पवयीन मुलीला बळजबरीने नेले लॉजवर; नराधमाने केले 'असे' दुष्कृत्य