ETV Bharat / state

Thane News: नाल्यात आढळून आलेल्या 'टायगर'ला इटलीतील दाम्पत्याने घेतले दत्तक - जयश्री रगडे

निर्दयी जन्मदात्यांनी ज्याला जन्म देताच मारण्यासाठी प्लास्टिक पिशवीत गुंडाळून उल्हासनगरमधील वडोळगावच्या नाल्यात चार वर्षांपूर्वी फेकून दिले होते. मात्र अशोका फाऊंडेशनचे शिवाजी रगडेसह त्यांच्या पत्नीने या नवजात बालकाला जीवदान देऊन ‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण तंतोतंत खरी ठरवली होती. नाल्यात आढळून आलेल्या 'टायगर'ला इटलीतील दाम्पत्याने घेतले दत्तक आहे.

Thane News
'टायगर'ला इटलीतील दाम्पत्याने घेतले दत्तक
author img

By

Published : Feb 19, 2023, 9:03 AM IST

ठाणे : विशेष म्हणजे नाल्यात फेकल्यामुळे डोक्याला लागलेला मार आणि नाकातोंडात गेलेले घाण पाणी यामुळे बाळाला मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला होता. त्यामुळे त्या नवजात बालकाला दूध देण्यात आले नव्हते. केवळ औषध आणि रक्त चढवण्यात येत होते. त्यानंतर तब्बल १८ दिवसांनंतर बालकाने जयश्री रगडे यांच्या कुशीत एक गोड स्माईल दिली होती. त्यावेळी त्याचे नाव टायगर ठेवले. यातून एकच संदेश गेला 'टायगर अभि जिंदा' आता हाच टायगर एकदम ठणठणीत बरा झाला आहे. त्याला इटली देशातील एका दाम्पत्याने दत्तक घेतले आहे. हे दाम्पत्य त्याला इटलीला घेऊन रवाना झाले आहे.

अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा : उल्हासनगर शहराच्या हद्दीत असलेल्या वडोल गावच्या एका नाल्यात ३० डिसेंबर २०१८ रोजी नुकतेच जन्मलेले मुल रडत असताना स्थानिकाना दिसले, तेव्हा समाजसेवक व अशोका फाऊंडेशनचे शिवाजी रगडे यांनी त्या नवजात बालकाला नाल्यातून बाहेर काढले. उचलुन उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. या बालकाची माहिती मध्यवर्ती पोलिसांनी दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी शोध सुरु केला.

टायगरवर शस्त्रक्रिया : दुसरीकडे डोक्याचा संसर्ग काही बरा होत नव्हता, म्हणून शिवाजी रगडे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि तत्कालीन आमदार ज्योती कलानी यांची मदत घेतली. त्यानंतर वाडिया हॉस्पिटलमध्ये संपर्क करून अ‍ॅडमिट करण्याची व्यवस्था करून दिली. त्यानंतर पुढे टायगरला वाडियामध्ये हलवले तेथे देखील खर्च लागत होता. रगडे यांनी हॉस्पिटल प्रशासनास विनंती केली. अगोदरच खूप खर्च झाला होता. त्यानंतर पुढे केटो या फँड रेजिंग एनजीओ बरोबर रगडे यांनी करार केला. वाडिया रुग्णालयामध्ये खाते उघडून २४ तासात १० लाख ४२ हजार जमा केले आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्या.

टायगर इटलीला रवाना : जवळपास ४ महिन्याच्या उपचारानंतर ५ एप्रिल २०१९ ला टायगरला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर रगडे दाम्पत्य आणि पोलिसांनी महिला बालकल्याण समितीच्या आदेशानुसार नवीमुंबईतील नेरुळ येथील विश्व बालक केंद्रात त्याला दाखल केले. विशेष म्हणजे रगडे दाम्पत्यास विनंतीनुसार टायगरला आठवड्यातुन एकदा भेटण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली होती. दरम्यान त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया पार पडल्या आणि त्या यशस्वीही झाल्या. त्यामुळे टायगर सुदृढ झाला. टायगर आता एकदम ठणठणीत झाल्यामुळे त्याची दत्तक प्रक्रिया सुरू होती. शेवटी इटलीमधील एक दापंत्य टायगरला दत्तक घेतण्यासाठी पुढे आले. त्यांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली. शुक्रवारी १७ फेब्रुवारी रोजी टायगर इटलीला रवाना झाला.

मृत्यूशी झुंज देऊन जगण्याची लढाई : दरम्यान, विश्व बालक केंद्राने टायगरचे जीवनदाते शिवाजी रगडे व त्यांच्या पत्नि जयश्री रगडे यांना १७ फेब्रुवारी रोजी शेवटचे टायगरला भेटायला व त्याच्या नवीन पालकांना भेटायला बोलावले. मात्र ही शेवटची भेट अतिशय भावनात्मक असल्याने शिवाजी रगडे व जयश्री रगडे यांच्यासह त्या नवीन मातेच्या डोळ्यात देखील अश्रू उभे ठाकले होते. परंतु रगडे दापत्यानी दिलेली प्रतिक्रिया अशी होती की आम्ही टायगरला दत्तक मागितले होते. मात्र कायद्यानुसार जरी आम्हाला त्याचे पालकत्व मिळाले नाही, तरी त्याच्यासाठी जे काही करता आले ते केले. परंतु आता टायगरला त्याच्या हक्काचे चांगले आई-वडील मिळालेले आहेत. टायगर खूप मोठा व्हावा, असे आशीर्वाद देऊन टायगरला साश्रृ नयनाने रवाना केले. टायगर विदेशी निघालेला आहे. सगळ्यांची प्रतिक्रिया येत आहे की, टायगरने ज्या प्रकारे मृत्यूशी झुंज देऊन जगण्याची लढाई जिंकली. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात देखील असाच लढून एक खूप मोठा माणूस बनेल.

हेही वाचा : Shiv Jayanti 2023 : शिवरायांच्या 61 फूट उंच भव्य मूर्तीचा विश्वविक्रम, डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.