ETV Bharat / state

कुटुंबीयांच्या विरोधाला कंटाळून प्रेमीयुगुलाची गळफास लावून आत्महत्या; मुलगी अल्पवयीन - thane

कुटुंबीयांच्या विरोधाला कंटाळून प्रेमीयुगुलाने गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील जंगलात घडली आहे. गणेश नकुल भोये (वय 21 रा, मालबिडी ) असे मुलाचे नाव असून, मुलगी अल्पवयीन आहे.

झाडाला लटकलेले मृतदेह
author img

By

Published : Jul 23, 2019, 7:39 PM IST

ठाणे - कुटुंबीयांच्या विरोधाला कंटाळून प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भिवंडी येथे घडली आहे. दोघांचे मागील १ वर्षापासून प्रेमसंबंध होते. परंतु, घरच्यांच्या वाढत्या विरोधामुळे दोघांनी आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील जंगलात घडली आहे. गणेश नकुल भोये (वय 21 रा, मालबिडी ) असे मुलाचे नाव असून, मुलगी अल्पवयीन आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रेमीयुगलाची वर्षभरापूर्वी एका नातेवाईकाच्या लग्न समारंभात ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. ते दोघेही एकमेकांना गुपचुप भेटत होते. मुलगी आठवीच्या वर्गात शिकत होती. तर, गणेश हा वडपे येथे गोदामात कामाला होता. या दोघांच्या प्रेमाची माहिती मुलीच्या आई-वडिलांना लागताच त्यांनी या प्रेमाला तीव्र विरोध केला. त्यामुळे हतबल झालेल्या मुलीने याबाबतची माहिती प्रियकर गणेशाला दिली. दोघांनी शनिवारी दुपारी घर सोडले होते. त्यानंतर शाळेत गेलेली मुलगी उशिरापर्यंत घरी परत आली नाही. म्हणून तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मुलगी सापडली नाही, त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी थेट मुलीच्या प्रियकर गणेश याचे घर गाठले. त्याच्या आई-वडिलांना आमची मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे सांगितले. त्यावेळी गणेशच्या आई- वडिलांनीही आमचा मुलगाही घरात नाही असे सांगितले.

दोन्ही मुले बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू असतानाच मंगळवारी सकाळच्या सुमारास जंगलात कंटोळे गोळा करण्यासाठी गेलेल्या मजुरांना एका वावळ्याच्या झाडाला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दोघांचेही मृतदेह लटकलेले दिसले. त्याची माहिती गावाच्या पोलीस पाटील अंकिता मुकेश पाटील यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ पडघा पोलीस ठाण्यात खबर दिली. पडघा पोलीस ठाण्याचे एपीआय राकेश लहांगे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन प्रेमी युगुलाचे मृतदेह झाडावरून उतरवले. घटनास्थळाचा पंचनामा करून, मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. शवविच्छेदनाचे कायदेशीर सोपस्कार पुर्ण केल्यानंतर दोघांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Intro:किट नंबर 319

Body:प्रेमीयुगुलाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

ठाणे :- वर्षभरापासून एका नातेवाईकांच्या लग्नसमारंभात ओळख झालेल्या शाळेकरी मुलीशी प्रेमसंबंध जोडल्याने दोघांच्याही भेटीगाठी, बोलणे ,चालणे सुरळीतपणे चालू होते, मात्र या दोघांच्या प्रेमसंबंधांना घरच्यांचा विरोध वाढला होता, त्यातच या प्रेमीयुगुलाचा आज सकाळच्या सुमारास जंगलातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दोघांचेही मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे ,

ही धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील कुशिवली, पाली येथील जंगलात घडली आहे, गणेश नकुल भोये (वय 21 रा, मालबिडी ) आणि रोशनी टबले (वय 16 रा. खरवली ) असे मृतदेह आढळून आलेल्या प्रेमी युगुलाचे नावे आहेत. तर दुसरीकडे "एक दुजे के लिए" या हिंदी चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा पंचक्रोशीत गावकरी करतात दिसत होती,
मिळालेल्या माहितीनुसार मृतक प्रेमीयुगल हे दोघेही वर्षभरापूर्वी एका नातेवाईकाच्या लग्नकार्यात ओळख झाली होती , या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ते दोघेही एकमेकांना चोरीछुपे भेटत होते, रोशनी अंबिस्ते हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत होती तर गणेश वडपे येथे गोदामात कामाला होता, मात्र या दोघांच्या प्रेमाची कुणकुण रोशनीच्या आई-वडिलांना लागताच त्यांनी या प्रेमाला तीव्र विरोध केला , त्यामुळे हतबल झालेल्या रोशनी ने याबाबतची माहिती प्रियकर गणेशाला दिली, दोघेही आकंठ प्रेमात बुडालेले असलेल्या कुटुंबाचे विरोधामुळे आपण एकमेकांचे जीवनसाथी होऊ शकत नाही अशी भावना या प्रेमी युगलाची झाल्याने त्यांनी शनिवारी दुपारी घर सोडले होते, त्यानंतर शाळेत गेलेली मुलगी घरी परत उशिरापर्यंत आले नाही त्यामुळे तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती सापडली नाही त्यामुळे तिच्या आईवडिलांनी थेट मुलीच्या प्रियकर गणेश याचे घर गाठले आणि त्याच्या आई-वडिलांना आमची मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे सांगितले, त्यावेळी गणेशच्य आई- वडिलांनाही आमचा मुलगाही घरात नाही असे सांगण्यात आले, तर गणेश रोशनीला दुचाकीवर घेऊन पाली येथील काकाकडे सायंकाळच्या सुमारास गेला होता, मात्र हे दोघेही काकाच्या घरी नव्हते त्यावेळी त्याने मोटरसायकल घरासमोर उभी करून हे दोघेही जंगलात गेले, दोन्ही मुले बेपत्ता असल्याने त्यांचाशोध सुरू असतानाच मंगळवारी सकाळच्या सुमारास कुशवली जंगलात कंटोळे गोळा करण्यासाठी गेलेल्या मजुरांना एका वावळ्याच्या झाडाला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दोघांचेही मृतदेह लटकलेली दिसली , त्याची माहिती कुशवली गावाच्या पोलीस पाटील अंकिता मुकेश पाटील यांना मिळाली असता त्यांनी तत्काळ पडघा पोलीस ठाण्यात खबर दिली त्यामुळे पडघा पोलीस ठाण्याचे एपीआय राकेश लहांगे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन प्रेमी युगलाची मृतदेह झाडावरून उतरवून घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले, शवविच्छेदनाचे कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर दोघांचे मृतदेह अंतिम संस्कारासाठी कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले , या घटनेप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस आणि पुढील तपास सुरू केला आहे,

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.