ETV Bharat / state

'थायरोकेयर लॅब'ला मनसेचा दणका.. पुढील आदेश येईपर्यंत कोरोना चाचणी नाही

कोरोनाचे चुकीचे अहवाल दिल्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत पनवेल येथील थायरोकेयर या लॅबमध्ये कोरोनाची चाचणी होणार नसल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.

थायरोकेयर लॅब
थायरोकेयर लॅब
author img

By

Published : Jun 8, 2020, 7:40 AM IST

नवी मुंबई - देशात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढतच आहे. आपल्याला कोरोना झाला आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी बरेचसे नागरिक खासगी लॅबचा पर्याय निवडत आहेत. कोरोना चाचणी करणाऱ्या खासगी प्रयोगशाळेने चुकीचे अहवाल दिल्याचा ठपका ठेवत महानगरपालिका प्रशासनाने या प्रयोगशाळेवर कोरोना चाचणी करण्यावर बंदी घातली आहे. मात्र, पनवेल परिसरात तपासणी मुख्यालय सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने मनसेचे ठाणे पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पनवेल येथील थायरोकेयरच्या मुख्यालयावर धडक देऊन आंदोलन करण्यात आले.

माहिती देताना ठाणे पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव

सद्यस्थितीत कोरोनाचा सर्वत्र प्रसार वाढत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कोरोनाची चाचणी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. पण, आता काही खासगी प्रयोगशाळाने यात देखील हेराफेरी करण्यास सुरुवात केली असल्याचे आरोप नागरिक करत आहेत. त्यात थायरोकेयर प्रयोगशाळेने तर नागरिकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. या प्रयोगशाळेमधून खोटे तपासणी अहवाल मिळत असल्याच्या अनेक तक्रारी येण्यास सुरुवात झाल्यानंतर शासन देखील खडबडून जागे झाले. त्या अनुषंगाने पनवेल, नवी मुंबई, मुंबईतील अनेक प्रयोगशाळा बंद करण्यात आल्या मात्र पनवेल येथील मुख्य तपासणी (टेस्टिंग) केंद्र मात्र सुरूच होते.

रविवारी (दि. 7 जून) मनसैनिकांनी ठाणे -पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पनवेल येथील थायरोकेयरच्या मुख्यालयावर धडक देऊन आंदोलन केले. त्यांच्या या दणक्याने सर्व प्रशासकीय व्यवस्था जागी झाली. पुढील सर्व अहवाल येईपर्यंत थायरोकेयर प्रयोगशाळेत कोरोना चाचणी पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे मनसेचे अविनाश जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा - पनवेल महापालिका क्षेत्रात आज कोरोनाचे १९ नवे रुग्ण तर, ४४ जणांना डिस्चार्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.