ETV Bharat / state

ठाण्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, आजपर्यंत 33 टक्के रुग्ण कोरोनामुक्त - ठाणे कोरोना बातमी

महापालिका क्षेत्रामध्ये उपचारानंतर बरे झालेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असून कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रुग्णांचे प्रमाण 33 टक्क्यांवर पोहोचले आहे. आतापर्यंत 414 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

corona recovery rate has increased in thane
ठाण्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
author img

By

Published : May 20, 2020, 3:10 PM IST

ठाणे - ठाणे शहरासाठी एक दिलासादायक वृत्त आहे. महापालिका क्षेत्रामध्ये उपचारानंतर बरे झालेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असून कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रुग्णांचे प्रमाण 33 टक्क्यांवर पोहोचले आहे. आतापर्यंत 414 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

ठाणे शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाबाधित आणि नॅान कोव्हिड रुग्ण मिक्स होवू नयेत, यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर लक्षणे असलेल्या आणि लक्षणे नसलेल्या कोव्हिड-१९ रुग्णांसाठीही वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेच्या वतीने निर्माण केलेल्या सुविधांमुळे कोरोनापासून बरे होण्याचे प्रमाण वाढले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण 33 टक्क्यांवर पोहोचले आहे.

ठाण्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 414 इतकी झाली आहे. कोव्हिड १९ च्या संशयित रुग्णांसाठी स्वतंत्रपणे उपचार करण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कोव्हिड १९ साठी निवडण्यात आलेल्या सर्व रुग्णालयामध्ये बाधित रुग्णांसाठी आयसोलेशनची प्रभावी यंत्रणा, योग्य उपचार पद्धती आदी उपाययोजनामुळे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.