ETV Bharat / state

कोरोनाग्रस्त आमदार गीता जैन यांचा विलगीकरणात वाढदिवस साजरा

मिरा भाईंदर शहराच्या अपक्ष आमदार गीता जैन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. परंतु, विलगीकरण करण्यात आले असतानादेखील त्यांनी वाढदिवस साजरा केल्यामुळे संपुर्ण शहरात चर्चेचा विषय बनला आहे.

corona positive mla geeta jain celebrated birthday on isolation ward in thane
कोरोनाग्रस्त आमदार गीता जैन यांचा विलगीकरणात वाढदिवस साजरा
author img

By

Published : Jul 6, 2020, 6:28 PM IST

ठाणे - मिरा भाईंदर शहराच्या अपक्ष आमदार गीता जैन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. परंतु, विलगीकरण करण्यात आले असतानादेखील त्यांनी वाढदिवस साजरा केल्यामुळे संपुर्ण शहरात चर्चेचा विषय बनला आहे. वाढदिवस साजरा करताना त्यांचे पॉझिटिव्ह पती आणि इतर परिवार उपस्थित असल्यामुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

corona positive mla geeta jain celebrated birthday on isolation ward in thane
कोरोनाग्रस्त आमदार गीता जैन यांचा विलगीकरणात वाढदिवस साजरा

अपक्ष आमदार गीता जैन यांचा १ जुलै रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना १० दिवसांकरिता एका खोलीत विलगीकरण करण्याचे निर्देश आरोग्य विभागाकडून देण्यात आले होते. अशा परिस्थितीत ५ जुलै रोजी गीता जैन यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. परंतु, त्या प्रसंगी त्यांचे पॉझिटिव्ह पती आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. एकीकडे प्रशासनाकडून सामान्य नागरिकांना घरात विलगीकरण होण्याची परवानगी देत नसताना, आमदारांकरिता वेगळा नियम का लागू करण्यात आला आहे.

मीरा भाईंदर शहरात दिवसेंदिवस कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर मृत्यूदर देखील वाढत आहे. कोरोनाचे गांभीर्य लक्षात न घेता अशा प्रकारे आमदारांकडून वाढदिवस साजरा करण्यात आल्यामुळे विरोधकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.