ETV Bharat / state

भिवंडीत पुन्हा 'मरकझ कनेक्शन'; नव्याने सापडलेल्या बाधितांमध्ये दोघांचा समावेश

भिवंडी शहरात शुक्रवारी सहा कोरोनाबाधित आढळले. यातील दोघांचे मरकझ कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले आहे.

corona positive found in bhivadi
भिवंडीत पुन्हा 'मरकझ कनेक्शन'; नव्याने सापडलेल्या बाधितांमध्ये दोघांचा समावेश
author img

By

Published : May 30, 2020, 9:34 PM IST

Updated : May 30, 2020, 11:09 PM IST

ठाणे - भिवंडी शहरात शुक्रवारी सहा कोरोनाबाधित आढळले. यातील दोघांचे मरकझ कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भिवंडीत पुन्हा 'मरकझ कनेक्शन'; नव्याने सापडलेल्या बाधितांमध्ये दोघांचा समावेश

दिल्लीतील निजामुद्दीन येथील 'मरकझ जमात'चे कोरोना कनेक्शन सुरुवातीला उघड झाल्यानंतर देशभरात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली होती. यातील अनेक व्यक्ती महाराष्ट्रातदेखील आल्या होत्या. भिवंडीतील नऊजण 20 मे रोजी मरकज कार्यक्रमासाठी दिल्लीत गेल्याने अडकले होते. ते भिवंडी शहरात दाखल झाले. यापैकी मिल्लतनगर एका व्यक्तीने त्यांना तत्काळ नजीकच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले. संबंधितांचे स्वॅब नमुने घेतल्यानंतर रिपोर्ट प्रलंबित असतानाच 23 मे रोजी त्यांना घरी पाठवण्यात आले. आता यातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे दोघेही जवळपास सहा दिवस विविध ठिकाणी वावरत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

या सर्व प्रकारास महानगरपालिका आरोग्य विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करोनाबाधित युवकांच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, 'कन्टेन्मेट झोन'बाबत महानगरपालिका प्रशासन गांभीर नसल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक हमीद शेख यांनी दिलीय. तसेच या संशयितांना एका नगरसेवकाच्या सल्ल्यावरून सोडून दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Last Updated : May 30, 2020, 11:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.