ETV Bharat / state

पनवेलमध्ये कोरोना रुग्णसंख्या घटली; मात्र मृत्यूदर वाढला, ४२ दिवसात ३२६ जणांचा मृत्यू - कोरोना पनवेल

पनवेल महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या घटली मात्र मृत्यूदर वाढला असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. रुग्णांनी लक्षणे लपवून ठेवल्याने थेट ऑक्सिजन व व्हेंटिलेटरवर ठेवण्याचे प्रकार या काळात वाढल्याने मृत्यूंची संख्या वाढल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

Corona outbreak decreased in Panvel
Corona outbreak decreased in Panvel
author img

By

Published : May 15, 2021, 8:52 PM IST

Updated : May 15, 2021, 9:02 PM IST

नवी मुंबई - दीड वर्षांच्या कोरोनाकाळात पनवेलमध्ये एक हजार कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. या काळात दुसऱ्या लाटेत १ एप्रिलपासून फक्त ४२ दिवसांत ३२६ जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या घटली मात्र मृत्यूदर वाढला असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. रुग्णांनी लक्षणे लपवून ठेवल्याने थेट ऑक्सिजन व व्हेंटिलेटरवर ठेवण्याचे प्रकार या काळात वाढल्याने मृत्यूंची संख्या वाढल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

४२ दिवसात ३२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू -

पनवेल पालिका क्षेत्रात आतापर्यंत ५४,३१६ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ५०,७१० रुग्ण बरे झाले, मात्र एक हजार जणांचा मृत्यू झाला. आजही २,६०६ रुग्ण विविध रुग्णालये व घरून उपचार घेत आहेत. दुसऱ्या लाटेत १ एप्रिलपासून फक्त ४२ दिवसांत ३२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पनवेलमध्ये कोरोना रुग्णसंख्या घटली
रुग्ण लक्षण लपवित असल्याने होत आहेत अत्यवस्थ -
मृतांची ही संख्या टाळता आली असती का, असा प्रश्न पनवेलकर विचारत असून पालिका प्रशासनाने हात झटकले आहेत. रुग्णांनी लक्षणे लपवून ठेवल्याने थेट ऑक्सिजन व व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज निर्माण होण्याचे प्रकार या काळात वाढल्याने मृत्यूंची संख्या वाढल्याचे उत्तर पालिका प्रशासनाने दिले आहे.
अपुरे मनुष्यबळ अधिक मृत्यूस कारणीभूत -
वाढत्या कोरोना मृत्यूमुळे पनवेल पालिकेने खास वैद्यकीय पथक नेमले होते. या पथकाच्या अहवालबाबत मात्र अद्याप कोणीही बोलण्यास तयार नाही. मात्र अपुरे मनुष्यबळ, कमी पडलेली आरोग्य व्यवस्था ही कोरोना मृत्यूस कारणीभूत असल्याची चर्चा पनवेलमध्ये सुरू आहे.
मृत्यूदर वाढूनही नागरिक करीत आहेत नियमभंग -
पनवेल पालिका क्षेत्रात आतापर्यंत ५४,३१६ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ५०,७१० रुग्ण बरे झाले, मात्र एक हजार जणांचा मृत्यू झाला. आजही २,६०६ रुग्ण विविध रुग्णालये व घरून उपचार घेत आहेत. १ एप्रिलपासून फक्त ४२ दिवसांत ३२६ जणांचा मृत्यू झाले आहेत. ही गंभीर परिस्थिती असतानाही पनवेलमध्ये अजूनही अनेक नागरिक नियमभंग करीत आहेत. विशेष म्हणजे पालिका अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत हे सर्व सुरू आहे.

Last Updated : May 15, 2021, 9:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.