ETV Bharat / state

खाकीला बदनाम करत केला महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच लंपट हवालदार फरार - चौकशी

एका 28 वर्षीय विवाहितेने तिचा पती मंगेश साळुंखे, सासरा विष्णू, सासू बेबी, दीर गणेश व जाऊ माया यांच्याविरोधात 17 एप्रिल 2019 रोजी भांदवि कलम 498, 323, 504, 506, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याबाबत जबाब नोंदविण्यासाठी पीडिता पोलीस ठाण्यात आली.

पोलिस ठाणे पडघा आणि सोबत हवालदार देविदास चव्हाण
author img

By

Published : Jun 30, 2019, 9:15 PM IST

ठाणे - येथील हवालदाराने एका महिलेचा विनयभंग करत खाकी वर्दीला बदनाम केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पडघा पोलीस ठाण्यात 28 वर्षीय विवाहितेने पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याचा तपास एका लंपट हवालदाराकडे आहे. मात्र, त्याने चौकशी करण्याच्या बहाण्याने तिला एकांतात बोलण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला आहे.

Police station padhgha and constable devidas chavhan
पोलिस ठाणे पडघा आणि सोबत हवालदार देविदास चव्हाण

याप्रकरणी, या हवालदाराविरोधात पडघा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच हा हवालदार फरार झाला. देविदास चव्हाण असे त्या हवालदाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका 28 वर्षीय विवाहितेने तिचा पती मंगेश साळुंखे, सासरा विष्णू, सासू बेबी, दीर गणेश व जाऊ माया यांच्याविरोधात 17 एप्रिल 2019 रोजी भांदवि कलम 498, 323, 504, 506, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याबाबत जबाब नोंदविण्यासाठी पीडिता पोलीस ठाण्यात आली. त्यावेळी पीडितेला पोलीस ठाण्यामध्ये एकांतात बोलवले. आणि तू शहापूर येथे एकटी ये, आपण फिरायला व हॉटेलमध्ये जाऊ असे सांगितले, हे ऐकून पीडितेला धक्का बसला व ती भयभीत झाली.

खाकीला बदनाम करत केला महिलेचा विनयभंग

त्यानंतर पीडिता माहेरी गेली. त्यानंतरही त्या हवालदाराने पुन्हा 5 ते 6 वेळा मोबाइलवर संपर्क करून फिरायला जाण्याचा तगादा लावला होता. अखेर या लंपट हवालदाराच्या त्रासाला कंटाळून पीडितेने ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ, शिवाजी राठोड यांच्याकडे लेखी तक्रार केली. आणि लंपटावर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार, पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांना चौकशीचे आदेश दिले.

या सखोल चौकशीत पीडितेचा विनयभंग केल्याचे निष्पन्न झाल्यावर हवालदार चव्हाण विरोधात भांदवी कलम 345(अ) (ड) 2, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच हा हवालदार फरार झाला. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रेखा लोंढे करीत आहेत. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ माजली आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:खळबळजनक ! लंपट हवालदाराविरोधात विनयभंगाचा गुन्हा; गुन्हा दाखल होताच लंपट फरार

ठाणे : खाकी वर्दीला बदनाम करण्यासारखी धक्कादायक घटना समोर आली आहे, पडघा पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळी विरोधात 28 वर्षीय विवाहितेने तक्रार दाखल केली होती, त्याचा तपास एका लंपट हवालदाराकडे असल्याने त्याने चौकशी करण्याच्या बहाण्याने तिला एकांतात बोलण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना घडली आहे,

याप्रकरणी पोलिस हवालदाराच्या विरोधात पडघा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे, देविदास चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्या हवालदाराचे नाव आहे, या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ माजली आहे

मिळालेल्या माहितीनुसार 28 वर्षीय विवाहितेने तिचा पती मंगेश साळुंखे, सासरा विष्णू, सासू बेबी, दीर गणेश व जाऊ माया( सर्व राहणार पडघा ) यांच्याविरोधात 17 एप्रिल 2019 रोजी भादवि कलम 498, 323, 504, 506, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे, या गुन्ह्याबाबत जबाब नोंदविण्यासाठी पीडिता पोलीस ठाण्यात आली, त्यावेळी पीडितेला पोलीस ठाण्यामधील पोट माळ्यावर एकांतात बोलवून तू शहापूर येथे एकटीच ये आपण फिरायला व हॉटेलमध्ये जाऊ असे सांगितले, हे ऐकून पीडितेला धक्काच बसून भयभीत झाल्याने तिने थेट अहमदनगर जिल्ह्यातील असलेले माहेर गाठले, त्यानंतरही पुन्हा 5 ते 6 वेळा मोबाइलवर संपर्क करून फिरायला जाण्याचा तगादा लंपटने लावला होता,
अखेर सतत लंपट हवालदार चव्हाण याच्या त्रासाला कंटाळून पिडितेने ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ, शिवाजी राठोड यांच्याकडे लेखी तक्रार करून लंपटावर कारवाईची मागणी केली होती, त्यानुसार पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांना चौकशीचे आदेश दिले, या सखोल चौकशीत पिडितेचा विनयभंग केल्याचे निष्पन्न झाल्यावर लंपट हवालदार चव्हाण विरोधात भदवी कलम 345(अ) (ड) 2, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला, गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण चव्हाण ला लागताच तो फरार झाला असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रेखा लोंढे करीत आहेत,
ftp foldar -- tha, padgha police. 30.6.19

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.