ठाणे - नुपूर शर्मा विरोधात मुंबई, भिवंडी, मुंब्रा पाठोपाठ आता अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल (Complaint Against Nupur Sharma) करण्यात आली आहे. शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी अंबरनाथ शहरातील मुस्लिम कमिटीकडून पोलीस ठाण्यात तक्रार (Ambernath Police Station) अर्ज देण्यात आला आहे. यामुळे भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
हेही वाचा - पैगंबरांचा अवमान करणाऱ्या नुपूर शर्माच्या अटकेसाठी राष्ट्रवादीची मुंब्रा येथे निदर्शने
अंबरनाथ पोलिसात अद्याप गुन्हा दाखल नाही - अंबरनाथ शहरातील ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह मुस्लिम वेल्फेअर कमिटीचे अध्यक्ष इमरान खान यांनी नुपूर शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, नुपूर शर्मा यांच्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची चर्चा काल दिवसभर सुरू होती. मात्र, शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी केवळ अर्ज आला असून, अर्जासंबंधी चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी अजून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी स्पष्ट केले आहे.
पुण्यातही गुन्हा दाखल - आक्षेपार्ह टिप्पणी ( Nupur Sharma on Prophet Muhammad ) केल्याच्या आरोपाखाली भाजपच्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा ( Case against BJP spokesperson Nupur Sharma ) दाखल केला आहे. नुपूर यांनी ज्ञानवापी मस्जिद संदर्भात एका टीव्ही न्यूज चॅनेलवर चर्चेदरम्यान आक्षेपार्ह बोलल्याचा आरोप आहे. रझा अकादमीकडून याबाबत तक्रार ( case against Nupur Sharma by raza academy ) करण्यात आली होती. त्यानंतर पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रारीची ( Nupur Sharma case Mumbai ) दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.