ठाणे: दोन वर्षांपासून इतर सणांप्रमाणेच गुढी पाडव्यावर तसेच शोभायात्रांवर करोनाचे सावट होते. त्यामुळे सण साजरे करता आले नाही. परंतु आज राज्याच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा साजरा होत आहे. अनेक भागांमध्ये शोभायात्रा काढण्यात येत आहे. दरवर्षी ठाण्यात गुढीपाडव्यानिमित्त गोपीनेश्वर मंदिर न्यास येथे मोठ्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. या शोभायात्रेमध्ये ठाण्यातील अनेक सामाजिक संस्था, पालिका प्रशासन, महिला, सामाजिक कार्यकर्ते, नेतेमंडळी सहभागी होत असतात. कोरोना नंतर होणाऱ्या या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात यंदा नागरिकांनी सहभागी झाले आहेत. सकाळपासूनच या शोभायात्रेची सुरुवात झाल्यावर नागरिकांनी रांगोळ्या काढून या शोभायात्रेचे स्वागत केले आहे.
मुख्यमंत्री यात्रेत सहभागी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्याच वेळी गुढी पाडव्याच्या स्वागत यात्रेत सहभागी झाले आहेत. कोळीनेश्वर देवस्थान जांभळी नाका येथून सुरू झालेल्या स्वागत यात्रेत मुख्यमंत्री यांनी पालखीवर पुष्पवृष्टी करून स्वागत यात्रेची सुरुवात केली. त्यानंतर ते स्वःत जांभळी नाका, टेम्भी नाका चरई ते हरिनिवास सर्कल पर्यन्त स्वागत यात्रेत सहभागी झाले. यादरम्यान त्यांच ठाणेकरांनी स्वःगत केले तर मुख्यमंत्री यांनी सुद्धा ठाणेकरांना नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
शोभायात्रेमध्ये पारंपारिक वेशभूषा: या शोभायात्रेमध्ये अनेक शाळांचे विद्यार्थी देखील सहभागी होत असतात. अनेक सामाजिक देखावे या शोभायात्रेमध्ये असतात. याशिवाय यात्रेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांची रॅली असते. गुढीपाडव्याच्या या शोभायात्रेमध्ये पारंपारिक वेशभूषा करून महिला दुचाकी चालवत सहभागी होतात. तसेच या शोभा यात्रेच्या निमित्ताने महिला सक्षमीकरणाचां विषय समोर मांडतात. दरवर्षी होणाऱ्या या शोभायात्रेसाठी अनेक दिवस जय्यत तयारी सुरू असते. सर्वच राजकीय पक्षाचे नेते या शोभा यात्रेत सहभागी होत असल्यामुळे ठाणे पोलीसाचा मोठा बंदोबस्त तैनात असतो.
महिला लेझिम पथक मेट्रो देखावा पसंतीला: आज निघालेल्या या गुढीपाडव्यानिमित्त च्या शोभयात्रेमध्ये महिला रॅली, महिला लेझीम पद्धत आणि मेट्रोचा देखावा हा सर्वांचे लक्ष केंद्रित करत होते. या शोभा यात्रेमध्ये अनेक सामाजिक विषयांना देखाव्याच्या स्वरूपात दाखवले गेले. अनेक पर्यावरण मंडळ देखील या शोभायात्रेमध्ये सहभागी होते. ठाणेकरांनी यात्रेत सहभागी होत आंनद साजरा केला.
हेही वाचा: Gudipadwa 2023 मराठी नववर्षाची होते गुढीपाडव्याला सुरुवात जाणून घ्या काय आहे महत्व