ठाणे : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती सर्वत्र मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथील चैत्यूभूमीवर अभिवादन करून ठाण्यातील कोर्ट नाका येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ.बाबासाहेबांच्यामुळे आज देशाचा कारभार सुरळीत सुरू आहे. लाखो लोकांनी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी केली. तसेच डॉ. बाबासाहेबांचे जागतिक दर्जाच स्मारक हे सरकार उभारणार असल्याची ग्यावी यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. तसेच शेतकरी लॅांग मार्चमध्ये मृत्यू झालेले शेतकरी पुंडलिक जाधव यांच्या परीवारास ५ लाख रुपये शासकीय मदत जाहीर केली.
डॉ. आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोर्ट नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला तसेच ठाणे रेल्वे स्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनतर आनंद आश्रम येथे शिंदे यांनी संवाद साधत विवीध विषयावर भाष्य केले. काही दिवसांपूर्वी नाशिक येथील शेतकरी लॉंग मार्च काढला होता. हा मोर्चा राज्य सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी असताना देखील प्रत्येक शेतकरी आपला आहे असे मानून, मोर्चात मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी पुंडलिक जाधव यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्यात आली. यावेळी ५ लाखांचा धनादेश त्यांच्या परिवाराच्या हातात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी मदतीचा हात दिला: दरम्यान दहिसर येथून गेलेल्या एक शिवसैनिकांचा अपघातात जखमी झाला होता. त्यांना देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी मदतीचा हात दिला. दरम्यान यावेळी एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. राहुल गांधी यांनी सावरकर यांचा अपमान केला आहे, तो सहन केला जाणार नाही. आम्ही त्यांच्या विरोधात सावरकर गौरव यात्रा आणि निषेध यात्रा काढत सावरकरांना घराघरात पोहचण्याचे काम केले असल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले. जे ५० खोके, ५० खोके करतात, पण आम्ही मुख्यमंत्री सहायत्ता निधीतून ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत केली असल्याची देखील शिंदे यांनी सांगीतले.