ETV Bharat / state

महिलेचे मंगळसूत्र लांबविणाऱ्या चोराला नागरिकांनी दिला चोप

दुकानात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवून पळणाऱ्या चोराला नागरिकांनी बदडल्याची घटना ठाण्याच्या डोंबिवली पूर्व परिसरात घडली आहे. योगेश पांडे हा अट्टल चोर असून अनेक ठिकाणी त्याने अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याची त्याने कबुली दिली. अशी माहीती पोलिसांनी दिली.

Citizens beaten thief who stole woman's ornament
महिलेचे मंगळसूत्र लांबविणाऱ्या चोराला नागरिकांनी दिला चोप
author img

By

Published : Dec 13, 2019, 9:03 PM IST

Updated : Dec 14, 2019, 12:02 AM IST

ठाणे - दुकानात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवून पळणाऱ्या चोराला नागरिकांनी बदडल्याची घटना डोंबिवली पूर्व परिसरात घडली आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्याला पकडण्यात यश आले.

महिलेचे मंगळसूत्र लांबविणाऱ्या चोराला नागरिकांनी दिला चोप

हेही वाचा - अशांत ईशान्य : 'कॅब' विरोधी आंदोलन चिघळलं, पोलीस गोळीबारात चार जणांचा मृत्यू!

डोंबिवली पूर्वेकडील पी अँड टी वसाहतीतील क्रॉस रोड परिसरात राहणाऱ्या सुजाता विश्वास धावडे (55) या दुपारच्या सुमारास इंदिरा चौकातील मोर्विका नामक दुकानात खरेदी केलेल्या साड्या बदली करण्यासाठी जात होत्या. यावेळी दुकानाच्या दारातच पाठीमागून आलेल्या चोराने सुजाता यांच्या गळ्यावर थाप मारली आणि गळ्यातील 2 तोळ्याचे मंगळसूत्र लांबवून पळ काढला. त्यांनी जोरजोरात आरडाओरडा केल्याने रस्त्यावरील नागरिकांनी पाठलाग करून चोराला पकडले. त्यानंतर नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. यावेळी चोराने मंगळसूत्र गिळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रामनगर पोलिसांना त्याला ताब्यात घेऊन केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले.

याप्रकरणी सुजाता धावडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. योगेश पांडे हा अट्टल चोर असून चोरटा विक्रोळी पार्कसाईट परिसरात राहणारा आहे. अनेक ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याची कबुली त्याने दिली असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश अहेर यांनी सांगितले.

Intro:kit 319Body:
डोंबिवलीत महिलेचे मंगळसूत्र लांबविणाऱ्या चोराचा पाठलाग करून नागरिकांनी बदडले

ठाणे : डोंबिवली पूर्वेकडील चौकात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवून पळणाऱ्या चोराला नागरिकांनी झोडपले. योगेश पांडे (19) असे या लुटारूचे नाव असून हा चोरटा विक्रोळी पार्कसाईट परिसरात राहणारा आहे.

डोंबिवली पूर्वेकडील पी अँड टी कॉलनी क्रॉस रोड परिसरात राहणाऱ्या सुजाता विश्वास धावडे (55) या दुपारच्या सुमारास इंदिरा चौकातील मोर्विका नामक दुकानात साड्या बदली करण्यासाठी जात होत्या. दुकानाच्या दारातच पाठीमागून आलेल्या चोराने सुजाता यांच्या गळ्यावर थाप मारली आणि गळ्यातील 2 तोळ्याचे मंगळसूत्र लांबवून पळ काढला. या चोराने केळकर रोडच्या दिशेने धूम ठोकली. सुजाता यांनी जोरजोरात आरडाओरडा केल्याने रस्त्यावरील नागरिकांना पाठलाग करून चोराला पकडले. त्यानंतर हाती लागलेल्या या चोरावर नागरिकांनी यथेच्छ झोडपले. याच दरम्यान सदर चोराने मंगळसूत्र गिळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रामनगर पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या ताब्यातील चोराला पोलिस ठाण्यात आणले. केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिलमध्ये या लुटारूला वैद्यकीय तपासणीकरिता पाठविण्यात आले.

या प्रकरणी सुजाता धावडे यांच्या जबानीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी योगेश पांडे हा सराईत चोर असून अशा प्रकारचे अनेक गुन्हे केले असल्याची त्याने प्राथमिक कबूली दिली असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश अहेर यांनी सांगितले.

Conclusion:dombiwali
Last Updated : Dec 14, 2019, 12:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.