ETV Bharat / state

अंत्यविधीसाठी इतर भागातील कोरोनाग्रस्त व्यक्तींचे मृतदेह आणत असल्याने स्मशानभूमीला ठोकले टाळे

वाशी आणि नवी मुंबईतील भागातील कोरोनाग्रस्त मृतदेहांना नेरूळ सेक्टर २ मधील सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी महापालिका अधिकारी व रूग्णालयाचे व्यवस्थापक पाठवत असल्याने सारसोळेच्या संतप्त युवकांनी स्मशानभूमीलाच टाळे ठोकले.

सारसोळे स्मशानभूमीला टाळे
सारसोळे स्मशानभूमीला टाळे
author img

By

Published : Aug 15, 2020, 5:36 PM IST

नवी मुंबई - सारसोळे ग्रामस्थांनी स्मशानभूमीला टाळे ठोकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतर भागातील कोरोना मृतदेह अंत्यविधीसाठी आणत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. कोरोनाग्रस्तांच्या अंत्यविधीसाठी स्वतंत्र स्मशानभूमीच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे. वाशी आणि नवी मुंबईतील भागातील कोरोनाग्रस्त मृतदेहांना नेरूळ सेक्टर २ मधील सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी महापालिका अधिकारी व रुग्णालयाचे व्यवस्थापक पाठवित असल्याने सारसोळेच्या संतप्त युवकांनी स्मशानभूमीलाच टाळे ठोकले. अखेर काही मान्यवरांच्या व पालिका अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने स्मशानभूमीचे टाळे काढण्यात आले.

सारसोळे स्मशानभूमीला टाळे

नवी मुंबईत कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यविधीसाठी स्वतंत्र स्मशानभूमी बनविण्याची मागणी सारसोळेच्या मनोज मेहेर यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व महापालिका आयुक्तांकडे केली आहे. अजूनही या मागणीचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, नवी मुंबईतील कोणत्याही भागातील कोरोनाग्रस्त मृतदेहांवर सारसोळेच्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी आणले जावू लागले आहे. विशेष म्हणजे पालिकेचेच अधिकारी नवी मुंबईत इतर स्मशानभूमी असूनही सारसोळेच्या स्मशानभूमीत कोरोनाग्रस्त मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पाठवतात. त्यामुळे यापुढे बाहेरील कोणत्याही भागातील कोरोनाग्रस्त मृतदेह सारसोळे स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी आणला, तर महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकाऱ्यांच्या टेबलावर तो मृतदेह ठेवू, असा इशारा यावेळी महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य व सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी दिला आहे.

हेही वाचा - राज्यभरात ७४वा स्वातंत्र्य दिन साध्या पद्धतीने साजरा..

बुधवारी मध्यरात्री मुंबईनिवासी एका कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहावर अंत्यविधी न करता सारसोळेच्या ग्रामस्थांनी परत पाठवून दिले. सकाळी अंत्यविधीसाठी खालापूरनिवासी एका कोरोनाग्रस्ताचा मृतदेह सारसोळे स्मशानभूमीत आणला जाणार असल्याचे समजताच सारसोळेच्या युवकांच्या संतापाचा उद्रेक झाला. युवकांनी स्मशानभूमीकडे धाव घेतली व थेट सारसोळे स्मशानभूमीलाच टाळे ठोकत फोटो महापालिका अधिकाऱ्यांना पाठवून दिले. मात्र, काही पालिका अधिकाऱ्यांच्या व समाजसेवकांच्या मध्यस्थीने युवकांची समजूत काढत टाळे काही वेळाने काढण्यात आले. असे असले तरी यापुढे बाहेरील कोरोनाग्रस्त मृतदेह आल्यास पालिकेत नेण्याचा आमचा निर्धार कायम असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.

हेही वाचा - 74वा स्वातंत्र्यदिन : पंढरीच्या विठुरायाला तिरंगी रंगाच्या फुलांची आरास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.