ETV Bharat / state

भिवंडीत पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोखला बालविवाह; नवरा मुलगा फरार - mandap

बुलडाणा पोलिसांचे पथक आल्यावर त्यांच्याकडे संबंधितांना सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर बुलडाणा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, बुलडाणा महिला व बालकल्याण समितीकडे या बालविवाह संदर्भात तक्रार प्राप्त झाली होती.

भिवंडीत पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोखला बालविवाह
author img

By

Published : May 18, 2019, 7:21 PM IST

ठाणे - भिवंडीत पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश आले आहे. लग्न लागण्याच्या एक तास आधी लग्नमंडपात पोलीस पोहचत त्यांनी अल्पवयीन मुलीसह तिच्या आई व भावास ताब्यात घेतले आहे. पोलीस कारवाईची चाहूल लागताच नवरदेवाने लग्नमंडपात येण्याआधीच पलायन केले आहे. ही घटना भिवंडीतील साठेनगर परिसरात घडली आहे.

भिवंडीत पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोखला बालविवाह

एका अल्पवयीन मुलीचे लग्न होत असल्याची माहिती बुलडाणा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांबळे यांनी नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांना देत अल्पवयीन मुलीच्या आईचा मोबाईल क्रमांक दिला. त्याआधारे लोकेशन तपासले असता ते भिवंडीतील साठेनगर अंजूरफाटा येथील दाखवत असल्याने मालोजी शिंदे यांनी तात्काळ पोलीस पथकास घटनास्थळी रवाना केले. पोलीस पथक घटनास्थळी पोहचले असता, लग्न मंडपात मुलीच्या कुटुंबीयांची लगीनघाई सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तत्काळ अल्पवयीन पीडित वधूसह तिची आई नीलाबाई उर्फ संगीता रमेश पवार व भाऊ दिलीप रमेश पवार या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणले असून नवरा मुलगा अक्षय सुरेश मेढेकर (रा. कालवार) याने लग्नघरी न येताच पळ काढला आहे.

याबाबत पोलीस अधिकारी मालोजी शिंदे यांनी सांगितले की, बुलडाणा तहसीलदार यांच्याकडे अल्पवयीन वधूच्या लग्नची तक्रार आली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार यांनी स्थानिक बुलडाणा पोलिसांकडे तपास सुपूर्द केला होता. तेथून लग्नघराचे अंतर लांबच्या पल्ल्याचे असल्याने बुलढाणा पोलिसांनी तत्काळ नारपोली पोलिसांशी संपर्क साधत याची माहिती दिली. त्यामुळे हा बालविवाह रोखता आला अशी माहिती त्यांनी दिली आहे. बुलडाणा पोलिसांचे पथक आल्यावर त्यांच्याकडे संबंधितांना सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर बुलडाणा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, बुलडाणा महिला व बालकल्याण समितीकडे या बालविवाह संदर्भात तक्रार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने ही कारवाई केली असून तत्पूर्वी बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा असल्याची माहिती पीडितेच्या कुटुंबियांना दिली होती अशी माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान, साठेनगर येथील लग्नस्थळी भेट दिली असता पीडितेचे वडील रमेश पवार यांचे नुकताच पाच महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यानंतर पीडित मुलगी आईसह बुलडाणा येथे राहत असून तिचा भाऊ दिलीप हा भिवंडीतील साठेनगर येथील आत्याकडे राहत होता. आपल्या बहिणीचा विवाह भिवंडी तालुक्यातील कालवार येथे राहणारा मूळचा बुलडाणा जिल्ह्यात राहणारा अक्षय सुरेश मेढेकर यांच्यासोबत ठरला होता. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हा विवाह सोहळा पार पडणार होता परंतु तत्पूर्वीच पोलिसांनी बालविवाहाचा डाव उधळून लावल्याने नवरा मुलगा अक्षय फरार झाला आहे.

भिवंडीत पोलिसांच्या सतर्कतेमुळे  रोखला बालविवाह;  नवरा मुलगा फरार 

ठाणे :- पोलिसांच्या सतर्कतेमुळे  बालविवाह रोखण्यात यश मिळाले असून लग्न लागण्याच्या एक तास आधी लग्नमंडपात पोलीस पोहचत त्यांनी अल्पवयीन मुलीसह तिच्या आई व भावास ताब्यात घेतले. तर   पोलीस कारवाईची चाहूल लागताच नवरदेवाने लग्न मंडपात येण्या आधीच पलायन केल्याची घटना समोर आली आहे. हि घटना भिवंडीतील साठेनगर परिसरात घडली आहे.

एका अल्पवयीन मुलीचे लग्न होत असल्याची माहिती बुलढाणा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांबळे यांनी नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांना मोबाइलद्वारा देत अल्पवयीन मुलीच्या आईचा मोबाईल क्रमांक दिला.  त्याआधारे लोकेशन तपासले असता ते भिवंडीतील साठेनगर अंजूरफाटा येथील दाखवीत असल्याने मालोजी शिंदे यांनी तात्काळ पोलीस पथकास घटनास्थळी रवाना केले. पोलीस पथक घटनास्थळी पोहचले असता, लग्न मंडपात मुलीच्या कुटुंबीयांची लगीनघाई सुरु असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तत्काळ अल्पवयीन पीडित वधूसह तिची आई नीलाबाई उर्फ संगीता रमेश पवार व भाऊ दिलीप रमेश पवार या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणले असून नवरा मुलगा अक्षय सुरेश मेढेकर रा. कालवार याने लग्नघरी न येताच पळ काढला आहे. 

याबाबत  पोलीस अधिकारी मालोजी शिंदे यांनी सांगितले की, बुलढाणा तहसीलदार यांच्याकडे अल्पवयीन वधूच्या लग्नची तक्रार आली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार यांनी स्थानिक बुलढाणा पोलिसांकडे तपास सुपूर्द केला होता. तेथून लग्नघराचे अंतर लांबच्या पल्ल्याचे असल्याने बुलढाणा पोलिसांनी तात्काळ नारपोली पोलिसांशी संपर्क साधत याची माहिती दिली. त्यामुळे हा बालविवाह रोखता आला अशी माहिती त्यांनी दिली असून बुलढाणा पोलिसांचे पथक आल्यावर त्यांच्याकडे संबंधितांना सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर बुलढाणा पोलीस वपोनि कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता बुलढाणा महिला व बालकल्याण समितीकडे या बालविवाह संदर्भात तक्रार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने ही  कारवाई केली असून तत्पूर्वी बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा असल्याची माहिती पीडितेच्या कुटुंबियांना दिली होती अशी माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान, साठेनगर येथील लग्नस्थळी भेट दिली असता पीडितेचे वडील रमेश पवार यांचे नुकताच पाच महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यानंतर पीडित मुलगी आईसह बुलढाणा येथे राहत असून तिचा भाऊ दिलीप हा भिवंडीतील साठेनगर येथील आत्याकडे राहत होता. आपल्या बहिणीचा विवाह भिवंडी तालुक्यातील कालवार येथे राहणारा मूळचा बुलढाणा जिल्ह्यात राहणारा अक्षय सुरेश मेढेकर यांच्यासोबत ठरला होता. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हा विवाह सोहळा पार पडणार होता परंतु तत्पूर्वीच पोलिसांनी बालविवाहाचा डाव उधळून लावल्याने नवरा मुलगा अक्षय फरार झाला आहे.   

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.