ठाणे: बाळासाहेबांचे शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून ठाण्यात कोपरी परिसरात स्वर दीपावली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी स्वतः मुख्यमंत्री Chief Minister Eknath Shinde उपस्थित असून मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय देखील यावेळी उपस्थित होते. याच स्वरदिपावलीच्या कार्यक्रमात नृत्य व संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला असून मुख्यमंत्र्यांच्या पत्नी स्वतः लता शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित असताना त्यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला आहे.
या कार्यक्रमासाठी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महिला पदाधिकाऱ्यांच्या सोबत या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी यांनी नाचण्याचा आनंद घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जेष्ठ नागरिकांसोबत संगीताच्या तालावर आनंद व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक नागरिक त्यांच्या सोबत फोटो काढण्यासाठी उत्सुक असतात.
तसेच काल चिमुकलीने देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावेळी मुख्यमंत्री स्वतः या चिमुकली सोबत खेळत असताना दिसून आले. मुख्यमंत्री अनेक कार्यक्रमातून वेगवेगळ्या नागरिकांना भेटताना दिसून येतात. त्यातच ठाण्यातील कार्यक्रमात सुद्धा मुख्यमंत्री यांनी नागरिकांसोबत वेळ घालवताना दिसून आले आहे.