नवी मुंबई - तळोजा एमआयडीसीतील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.
तळोजा एमआयडीसी परिसरात प्लॉट क्रमांक 95 येथे असलेली दीपकेम कंपनीला भीषण आग लागली. संबंधित कंपनी ही केमिकलपासून पावडर बनवण्याची प्रक्रिया करते. या आगीत डिस्टिलेशन प्लांट पूर्णपणे जळून खाक झाला आहे. यामुळे एमआयडीसी परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे. घटनास्थळी तत्काळ अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.