ठाणे : लव्ह प्यार और धोका या हिंदी चित्रपटाच्या कथेप्रमाणेच धक्कादायक घटना एका ३० वर्षीय महिला कॉन्स्टेबलच्या जीवनात घडली आहे. आर्मीत जवान असलेल्या २८ वर्षीय तरुणाशी पीडित महिला कॉन्स्टेबलची इंस्टाग्रामवर ओळख झाली, दोघात प्रेम जुळले. मात्र त्यानंतर प्रेमाच्या संधीचा फायदा घेऊन आर्मीत जवान असलेल्या प्रियकराने महिला कॉन्स्टेबल प्रेयसीला गुंगीकारक थंड पेय पाजून, तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
आरोपी प्रियकरावर गुन्हा दाखल: याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आर्मीत जवान असलेल्या प्रियकरावर, अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आकाश घुले असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. तो सद्या पुणे जिल्ह्यातील आर्मी कार्यलयात जवान म्हणून कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कॉन्स्टेबल कल्याण पूर्वेत कुटूंबासह राहते. ती मुंबई दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. तर आरोपी आकाश हा कल्याण पश्चिम भागात राहत असून तो मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवाशी आहे.
वर्षभर दोघांमध्ये प्रेमाचे सूत जुळले: त्यातच २०२१ साली पीडित महिला कॉन्स्टेबल हिची इंस्टाग्रामवर आरोपी आकाशची ओळख झाली होती. त्यानंतर दोघात मैत्री झाली. आरोपीने आपण आर्मीत जवान आहे असे सांगितले. तू कशी दिसते, तुला मला बघायचे आहे, असे बोलून प्रेमाच्या जाळ्यात पीडितेला अडकले. त्यानंतर वर्षभर दोघांमध्ये प्रेमाचे सूत जुळ्याने, त्यांचे सतत मोबाईलवर बोलणे होत होते. त्यातच मे २०२२ मध्ये आरोपी प्रियकर आकाश हा पीडितेच्या कल्याण पूर्वेतील घरी आला होता. त्यावेळी रात्रीच्या सुमारास पीडितेला गुंगीकारक थंड पेय पाजून तिच्यावर बलात्कार केला. मात्र बलात्काराच्या घटनेनंतर आरोपीने प्रेमाच्या आणा भाका देऊन, लग्न करण्याचे आमिष दाखवत पीडितेला शांत केले. त्यानंतर मात्र लग्नाच्या आमिष दाखवून पिडीतेबरोबर वर्षभर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार: एके दिवशी तर आरोपी प्रियकराने पीडितेला मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून सांगितले कि, तू विवस्त्र होऊन व्हिडिओ कॉल समोर ये. जर तू नाही आलीस तर, मी दुसऱ्या मुलीशी लग्न करेन अशी धमकी दिली होती. तसेच पीडितेला विवस्त्र होण्यास भाग पाडल्याचे पीडितेने दिलेल्या तक्रारीत सांगितले. विशेष म्हणजे पीडितेच्या घरी वारंवार येऊन तिच्यावर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करत होता. त्याच दरम्यान पीडितेला घेऊन आरोपी तिच्या मूळ गावी गेला होता. त्यावेळी पिडीतेने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला होता. मात्र त्यावेळी पीडितेला जातीचे कारण देत आरोपीने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे पीडिता बीड जिल्ह्यातील संबधित पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपी आकाश विरुद्ध तक्रार देण्यासाठी गेली होती, मात्र त्यावेळी आरोपी आकाशने तेथील पोलिसांसमोर पीडितेशी लग्न करण्यास होकार दिल्याने, पिडीतेने तक्रार दिली नव्हती.
जातीमुळे दिला नकार: दरम्यान, काही दिवसापूर्वीही मी वेगळ्या जातीचा आहे. तू खालच्या जाती असल्याचे कारण देत आरोपी प्रियकराने पुन्हा लग्न करण्यास नकार दिला. त्यांनतर मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पिडीतेने २५ मे रोजी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी आकाशवर ३७६ (२) (एन ) , ३२८, सह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला असल्याचे, पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.
हेही वाचा -
- Nashik Crime धक्कादायक वाढदिवसानिमित्ताने अल्पवयीन मैत्रिणीला घरी बोलावले अन् केला बलात्कार
- Mumbai Crime News ज्या व्यक्तीच्या घरी राहिली त्या व्यक्तीनेच बलात्कार केला ब्राझिलियन विद्यार्थिनीचा आरोप
- Sexual Assaulting Minor Girl पनवेल रेल्वे स्थानक परिसरात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणारा नराधम गजाआड