ETV Bharat / state

कसारा लोकलच्या 22 फेऱ्या वाढल्या; मात्र 8 स्थानकांत थांबा नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी - thane local train news

कोरोनाकाळात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेने उपविभागीय रेल्वे सेवा सुरू केली आहे. मात्र, प्रवाशांची संख्या जास्त व रेल्वेच्या फेऱ्या कमी असल्याने गाड्यांना गर्दी होत आहे. यामुळे कसारा लोकलच्या 22 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. मात्र, आठ स्थानकांवर रेल्वे थांबणार नसल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

लोकल रेल्वे
लोकल रेल्वे
author img

By

Published : Sep 27, 2020, 5:13 PM IST

ठाणे - मध्य रेल्वेने लोकल फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला असून त्यात कसारा लोकलच्या 22 फेऱ्या वाढवल्या आहेत. मात्र, या लोकल ट्रेनही कल्याण-कसारा स्थानकादरम्यानच्या 8 स्थानकांवर थांबणार नाहीत. या गाड्या केवळ टिटवाळा स्थानकात थांबत असल्याने 8 स्थानकांतील प्रवासी रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत असून लोकल सर्व रेल्वेस्थानकात थाबविण्यात याव्यात, अशी मागणी रेल्वे प्रवासी करत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावत असलेल्या लोकलमध्ये कर्मचाऱ्यांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकलमध्ये अनेक विभागांतील अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवेश दिल्यानंतर लोकलमध्ये गर्दी अधिकच वाढली आहे. त्यातच आता सर्व बँक कर्मचाऱ्यांनाही प्रवास करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे लोकल रेल्वेमधील वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोरोनाच्या संसर्ग पसरू नयेत, यासाठी पूर्वी 24 अप-डाऊन फेऱ्या होत्या. आता त्या वाढुन 46 करण्यात आल्याने कल्याण ते कसारादरम्यान प्रवास करणाऱ्या आसनगाव व कसारा येथील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, 22 फेऱ्या वाढवलेल्या कसारा लोकलही कल्याण-कसारा दरम्यान असलेल्या खर्डी, उबरमाली, तानशेत, आटगाव, वासिंद, खडवली, आबिवली व शहाड या स्थानकावर लोकल थांबणार नसल्याने येथील अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना या रेल्वेने प्रवास करता येणार नाही. त्यामुळे या स्थानकादरम्यान कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मिळेल त्या वाहनाने कामाचे ठिकाण गाठावे लागत असल्याने त्यांचे हाल सुरुच आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा - धक्कादायक! ठाण्यात सेवानिवृत्त आरटीओ अधिकाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.