ETV Bharat / state

मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही ठप्प, लोकल पकडण्यासाठी चाकरमान्यांचे हाल

ठाणे ते कसारा, कर्जत वाहतूक सुरू आहे. तर मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही ठप्प
author img

By

Published : Sep 4, 2019, 9:14 PM IST

ठाणे - मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसाचा फटका हा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला देखील बसला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईची मध्य रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही ठप्प

हेही वाचा- पावसामुळे लोकल बंद; मोनो रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी

ठाणे ते कसारा, कर्जत वाहतूक सुरू आहे. मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. हार्बर मार्गावरील वाशी ते सीएसएमटी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नालासोपारा स्थानकात रुळावर पाणी साचले आहे.

हेही वाचा- मुंबईत मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी

नालासोपारा रेल्वे स्थानकात रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. वसई-विरार दरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आणि पालघरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

Intro:लोकल पकडण्यासाठी चाकरमान्यांचे हालBody:ठाणे फ्लॅश

अजूनही मध्य रेल्वे ठाणे आणि सीएसएमटी दरम्यान ठप्प,

ठाणे ते कर्जत, कसारा, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर अश्या ट्रेन सुरू आहेत,

हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी, गोरेगाव, अंधेरी सेवा बंद आहे, तर वाशी पनवेल सेवा सूरी आहेत,

ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा सुरू आहेत,

पश्चिम रेल्वेवर अजूनही चर्चगेट ते अंधेरी धीम्या सेवा अजूनही बंद आहेत, जलद मार्गावर खूप अंतराने लोकल धावत आहेत, तर वसई आणि विरार दरम्यान सेवा पूर्णपणे बंद आहेतConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.