ठाणे : ठाणे पालिकेतील प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर आणि अन्य दोघांमधील हे संभाषण वायरल झाले असल्याचा दावा करण्यात येत आहे. ठाणे पालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर आणि समोरच्या व्यक्तीच्या ऑडिओ किल्पमध्ये जीवे ठार मारण्याच्या गंभीर षड्यंत्राचा उलगडा होत असल्याचे सांगितले जात आहे. आव्हाडांची कन्या आणि जावई यांच्या गेमचे षडयंत्र रचल्याचे आणि माझ्यावर काही येऊ नये म्हणून मी सीन क्रिएट केल्याचे स्पष्ट संभाषण व्हायरल झाले. एकीकडे महेश आहेर असले तरीही दुसऱ्या बाजूला संभाषण करणारा व्यक्ती कोण ? याबाबत अद्याप उलगडा झालेला नाही. क्लिपमध्ये तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूरच्या नावाचा देखील समावेश करण्यात आला आहे.
आव्हाडांच्या कुटुंबियांना संपविण्याची धमकी : जितेंद्र आव्हाडांच्या कुटुंबियांना संपविण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले आहेत, असा दावा क्लिपमध्ये करण्यात आला होता. ही व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप ठाणे महानगर पालिकेतील अधिकारी महेश आहेर यांची असल्याचा दावा केला जात होता. या ऑडिओ क्लिपमुळे ठाण्यात खळबळ माजली आहे.
पोलीसांच्या समोर मारहाण : माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याच्या नियोजनाची क्लिप वायरल झाली होती. आव्हाडांच्या कुटुंबियांना संपविण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याचा त्यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. क्लिप व्हायरल होताच राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी संध्याकाळी मुख्यालयाच्या बाहेर आलेल्या सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना बॉडीगार्ड, पोलीसांच्या समोर मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला.
जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया : माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. मी टीव्हीवर माझ्या कुटुंबियांबद्दल धमकी दिल्याची क्लिप पाहिली होती. माझ्या मुलीला स्पेनमध्ये मारणार आहेत. त्यासाठी बाबाजी नावाचा शूटर असणार आहे. या प्रकाराशी माझा काहीही संबंध नाही. मी माझ्या कुटुंबीयांची सुरक्षा करण्यासाठी समर्थ आहे. आता जी क्लिप व्हायरल झाली आहे, मी याबाबत कुठेही तक्रार करणार नाही. कारण कारवाई होणारच नाही. त्यामुळे आता पोलिसांनीच बाबाजी कोण याचा शोध घ्यावा असे डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते.