ETV Bharat / state

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या विरोधात पोलीसात तक्रार दाखल, हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप - thane

ठाण्यातील उल्हासनगर येथील एका महिला वकिलाने उर्मिला विरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी या तक्रारीवरुन उर्मिला मातोंडकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

...यामुळे उर्मिला मातोंडकर विरोधात उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
author img

By

Published : Apr 14, 2019, 7:10 PM IST

Updated : Apr 14, 2019, 7:50 PM IST

ठाणे - बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अलिकडेच राजकारणात एन्ट्री घेतली आहे. एका वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना हिंदू धर्माबद्दल अशोभनीय वक्तव्य केल्यामुळे ठाण्यातील उल्हासनगर येथील एका महिला वकिलाने उर्मिला यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी या तक्रारीवरून उर्मिला मातोंडकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उर्मिला मातोंडकर काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. अलिकडेच त्यांनी एका वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना हिंदू धर्माबद्दल अशोभनीय वक्तव्य केल्याचे समोर आले होते. याविरोधात महिला वकील राखी बरोड यांनी विठ्ठल वाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. सोबतच काही पुरावेदेखील सादर केले होते. अखेर या पुराव्यांच्या आधारावर उर्मिलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास विठ्ठलवाडी पोलीस करत आहेत.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांच्या विरोधात उलहासनागरात गुन्हा दाखल

ठाणे :- एका वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना हिंदू धर्माबद्दल अशोभनीय वक्तव्य केल्याचा आरोप ठेवत, काँग्रेसच्या तिकिटावर मुंबई तुन लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या विरोधात उलहासनागर मधील विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात एका महिला वकिलांनी तक्रार दाखल केली आहे, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करीत पोलीस तपास सुरू केला आहे,

उल्हासनगर शहरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या महिला वकील राखी बारोड यांनी आरोप केले की दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी नुकताच एका वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना हिंदू धर्माबद्दल अशोभनीय वक्तव्य केल्याचे समोर आले होते यामुळे महिला वकील राखी बरोड यांनी विठ्ठल वाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती, या तक्रारी सोबतच त्यांनी काही पुरावेही पोलिसांकडे सादर केली होती, अखेर या पुराव्यांच्या आधारावर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे,

Conclusion:अभिनेत्री ऊर्मिला वर गुन्हा
Last Updated : Apr 14, 2019, 7:50 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.