ठाणे - मनसेचे पदाधिकारी असलेले योगीराज देशमुख यांनी दोन दिवसापूर्वीच प्रांत अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाची फोडफोड केली होती. याप्रकरणी देशमुख यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मामावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांचा भाचा भलताच भडकला. त्याने देशमुख यांच्या फेसबुक अकाऊंडवर फक्त गाडीचे फोडायची नाही, तर अधिकाऱ्याला गाडीसह जाळू टाकण्याची धमकी दिली, यामुळे मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आरोपी देशमुख यांच्या भाच्या विरोधात प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी गुन्हा दाखल आहे. दीपक सूर्यवंशी असे गुन्हा दाखल झालेल्या भाच्याचे नाव आहे. मात्र या घटनेमुळे अधिकाऱ्यांच्या वाहन तोडफोड प्रकरणी वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
देशमुख यांच्यावर शासकीय वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यामुळे आरोपी भाचा याने देशमुख यांच्या फेसबुक अकांउटवर फॉलो करीत पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये 'जिथं विषय गंभीर तिथं मामाच खंबीर' तसेच 'फक्त गाडीचं फोडायची नाही, गाडी सकट त्या अधिकाऱ्याला जाळू अशा मजकूरासह अश्लील शिवीगाळही पोस्टमध्ये लिहली. त्यामुळे प्रांत अधिकारी गिरासे यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात शिवीगाळ व जीवेठार मारण्याची फेसबुकवरून धमकी दिल्याप्रकरणी दीपक सूर्यवंशी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
प्रांत अधिकाऱ्यांनी भेट नाकारल्याने घडला होता प्रकार -
उल्हासनगर नंबर कॅम्प एक आणि दोन याठिकाणी शासकीय मोकळे भूखंड असून त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम होत असल्याची तक्रारी देशमुख यांनी केल्या आहेत. त्या संदर्भात वारंवार तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी गिरासे यांना भेट देत माहिती दिली असताना त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे दोन दिवसापूर्वी कार्यलयात भेटायला गेलो असता, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना भेटू न दिल्याने हे कृत्य केल्याचे देशमुख याने सांगितले. विशेष म्हणजे उपविभागीय दंडाअधिकारी जगतसिंग गिरासे यांचे शासकीय वाहनाची तोडफोड करताना मोबाईलमध्ये कैद झालेला व्हिडिओ देखील समोर आला आहे.