ETV Bharat / state

कपडा व्यवसायातील भागीदारानेच घातला दोन कोटींचा गंडा; पाच जणांवर गुन्हा - दोन कोटींचा गंडा

कपडा व्यवसायातील भागीदारानेच सहकाऱ्याची दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाच जणांविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात ( Bhiwandi Police ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलाश कोठारी, सुंदरलाल कोठारी, पवन कोठारी, इंदू कोठारी, दलिप सिंग अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

भिवंडी पोलीस ठाणे
भिवंडी पोलीस ठाणे
author img

By

Published : Jun 4, 2022, 7:12 PM IST

ठाणे - कपडा व्यवसायातील भागीदारानेच सहकाऱ्याची दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाच जणांविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात ( Bhiwandi Police ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलाश कोठारी, सुंदरलाल कोठारी, पवन कोठारी, इंदू कोठारी, दलिप सिंग अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

कौटुंबिक संबंध असल्याचा फायदा घेत फसवणूक - गुन्हा दाखल झालेल्यापैकी कैलाश, सुंदरलाल व पवन यांनी आपसात संगनमत करून तक्रारदार सुशिल पुरुषोत्तम पहाडीया ( रा.वृंदावन सोसायटी, ठाणे ) यांच्याशी कौटुंबिक संबंध असल्याचा फायदा घेत आरोपी कैलाश, सुंदरलाल आणि पवन यांनी तक्रारदार सुशीलला भेटून कपडा व्यवसायात चांगला अनुभव असल्याचे सांगत गुंतवणूक करून भागीदारी करण्यास सांगितले. आरोपीवर विश्वास ठेवून त्यानंतर सुशील व त्याचा भाऊ संदीप यांनी कपडा व्यवसायात स्वतःला 25-25 टक्के तर आरोपी कैलाशला 50 टक्के, असे देण्याचे ठरवून व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी कैलाशवरच सोपवून जीएसटी नंबर काढला.

कंपनीच्या रक्केमचा असा केला अपहार - आरोपी कैलाशने जाणीवपूर्वक स्वतःची पत्नी इंदू कोठारी व दलिप सिंग यांच्या नावे 'महावीर सिंथेटिक्स व भैरव सिंथेटिक्स' नावाने कंपनी सुरू करून जीएसटी नंबर काढून ग्राहकांना त्या कंपन्यांचा इन्व्हाइस विविध होलसेलर्स व्यवसायिकांना दिला. त्यामुळे लाखो रुपये परस्पर त्यांच्या कंपन्यांच्या खात्याची रक्कम 23 जून, 2020 ते 4 फेब्रुवारी, 2022 पावेतो जमा करून आरोपींनी तब्बल दोन कोटींची फसवणूक केली आहे. फसवणूक लक्षात आल्यानंतर पाच जणांवर शुक्रवारी ( दि. 3 जून ) भिवंडी शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि.चे कलम 406, 409, 420 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा - गृह निर्माण विभाग पोलीस महासंचालकांनी केली भिवंडीतील निजामपुरा पोलीस स्टेशनची पाहणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.