ETV Bharat / state

चालक लघुशंका करताना अल्पवयीन चोराने पळवली कार; २४ तासात आरोपी ताब्यात

author img

By

Published : Jan 31, 2022, 8:06 PM IST

Updated : Jan 31, 2022, 8:19 PM IST

कॅब चालक लघुशंका करताना कारमधील अल्पवयीन चोराने त्याला धक्का देत गंभीर जखमी केले. त्यानंतर त्या चोराने ती कार पळवून नेली. ही घटना मुंबई - नाशिक मार्गावरील पिंपळास फाटा येथे घडली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात (Kongaon Police Station) कॅब चालकाने तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

car robbery
अल्पवयीन कारसह ताब्यात

ठाणे - अल्पवयीन चोरट्या प्रवाशाने (Minor Thief Stolen Car) लघुशंका आल्याचा बहाणा करत निर्जनस्थळी कारमधून उतरला होता. त्यापाठोपाठ कॅबचालकही लघुशंका करण्यासाठी उतरला होता. त्यावेळी अल्पवयीन प्रवाशाने जोरात धक्का मारून चालकाला रस्त्याच्या कडेला ढकलून दिल्याने चालक गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याची कार अल्पवयीन चोरट्याने पळवल्याची घटना समोर आली आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

ही घटना मुंबई - नाशिक मार्गावरील पिंपळास फाटा येथे घडली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात (Kongaon Police Station) कॅब चालक नितीन पडवळ यांनी अनोळखी प्रवाशावर कार चोरीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी २४ तासाच्या आतच १७ वर्षीय अल्पवयीन चोरट्याला कारसह ताब्यात घेतले आहे.

महिनाभरापूर्वीच खरेदी केली होती कार -

कॅब चालक नितीन पडवळ (वय ४९) हे नवी मुंबईतील घणसोली परिसरात राहत असून, गेल्या १२ वर्षापासून ते कार चालक म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वीच नितीन यांनी मित्राकडून कर्ज घेऊन एमएच ०३/ बीसी ३६५५ ही सेकंडहँड स्विफ्ट डिझायर खरेदी केली. त्यानंतर ही कार कॅब कंपनीद्वारे चालवत होते. त्यातच काल पहाटे चार वाजल्याच्या सुमारास एका प्रवाशाने ठाण्यातील जांभळी नाका येथून कल्याणला येण्यासाठी ऍपवरून कॅब कार बुक केली होती. त्यांनतर काही वेळातच कॅब चालक नितीन हे त्या प्रवाशाला घेऊन कारमधून कल्याणला निघाले होते.

चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत-

ठाण्याहून कल्याणच्या दिशेने येताना मध्येच मुंबई - नाशिक मार्गावरील पिंपळास फाटा येथे निर्जनस्थळी लघुशंका आल्याचे सांगत कॅब चालकाला कार थांबवायला सांगितले. त्यानंतर अल्पवयीन चोरटा कारमधून रस्त्याच्या कडेला जाऊन लघुशंका करत असल्याचा बहाणा करत होता. त्यातच कॅब चालकही लघुशंका करण्यासाठी कारमधून उतरून रस्त्याच्याकडेला गेला. त्याच सुमाराला लघुशंका करत असतानाच त्या अल्पवयीन चोरट्या प्रवाशाने चालकाला जोरात धक्का मारून रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडात ढकलून दिल्याने कार चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर काही क्षणातच तो अल्पवयीन प्रवासी कार घेऊन नाशिकच्या दिशेने पळून गेला. शिवाय चालकाचा कारमध्येच असलेला मोबाईलही त्यासोबत पळवला होता.

सीसीटीव्ही फुटेज व त्रांतिक तपासामुळे गुन्हा उघडकीस -

घटनेचे गांभीर्य पाहता वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पराग भाट यांनी पथकासह महामार्गावरील २० ते २५ सीसीटीव्ही फुटेज व अल्पवयीन चोरट्याने ज्या मोबाईलवरून कॅब बुक केली होती, त्या आधारे तपास सुरु केला. मात्र, पोलीस आपल्या मागावर येतील म्हणून अल्पवयीन चोरट्याने त्याचा व चालकाचा मोबाईल रस्तात फेकून दिला. तसेच पडघा टोल नाक्यावरून हा चोरटा पुन्हा मुंबईच्या दिशेने जाताना एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने ठाण्याच्या दिशेने तपास सुरु केला. त्यावेळी या अल्पवयीन चोरट्याने खारेगाव टोल नाक्यावर कार उभी करून तो त्याच परिसरात फिरताना दिसताच त्याला पोलीस पथकाने कारसह ताब्यात घेतले.

कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान-

या अल्पवयीन चोरट्याला कार चालवण्याचा अनुभव नसताना त्याने कार पळवली. त्यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याला आज बाल न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी भिवंडीतील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. तर त्याने कुठल्या उद्देशाने कार चोरी केली होती याचा तपास एपीआय किरण वाघ करीत आहेत.

Last Updated : Jan 31, 2022, 8:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.