ETV Bharat / state

शंकर-पार्वतीच्या रहिवाशांना रस्त्यावर आणण्याचा घाट; बिल्डर आणि अधिकाऱ्यांचे षडयंत्र चव्हाट्यावर - complex

या इमारतीचे ठिकठिकाणी स्लॅबचे प्लास्टर कोसळून आतील गंजलेल्या सळया बाहेर निघाल्या आहेत. या इमारतीत रहिवासी गेल्या अनेक दिवसांपासून जीव मुठीत धरून वास्तव्य करत आहेत. मात्र, आता या इमारतीतील १६ रहिवासी कुटुंबे बेघर होणार असून त्यांना पर्यायी निवारा देण्यास एमआयडीसी व केडीएमसी यांनी नकार दिला आहे.

शंकर पार्वती इमारत
author img

By

Published : Jun 9, 2019, 7:43 PM IST

ठाणे - डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागामधील शंकर पार्वती को-ऑप. हाऊसिंग सोसायटी (RH ९८) ही इमारत केडीएमसी व एमआयडीसीने धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. ही इमारत येत्या २ दिवसात पाडून टाकण्यात येणार आहे. तशी तयारी केडीएमसी आणि एमआयडीसीतर्फे करण्यात आली आहे. मात्र या इमारतीतील रहिवाशांची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाने या रहिवाशांना देशोधडीला लावण्याचा घाट घातला असल्याचा आरोप होत आहे. ही इमारत पाडण्यासाठी कथित बिल्डर तथा केडीएमसी अधिकाऱ्यांचे षडयंत्र रहिवाशांनी चव्हाट्यावर आणले आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांमधील इमारतींची मोजदादच नसल्यामुळे या भागात गेल्या वर्षी किती आणि कोणत्या ठिकाणी धोकादायक इमारती होत्या. याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. मात्र औद्योगिक निवासी विभागातील फेज २ मधल्या आर एच - ९८ या भूखंडावर शंकर पार्वती नामक तळ +1 मजली ही जुने बांधकाम असलेली इमारत सद्याच्या घडीला अत्यंत जीर्ण झाली आहे. या इमारतीचे ठिकठिकाणी स्लॅबचे प्लास्टर कोसळून आतील गंजलेल्या सळया बाहेर निघाल्या आहेत. या इमारतीत रहिवासी गेल्या अनेक दिवसांपासून जीव मुठीत धरून वास्तव्य करत आहेत. मात्र, आता या इमारतीतील १६ रहिवासी कुटुंबे बेघर होणार असून त्यांना पर्यायी निवारा देण्यास एमआयडीसी व केडीएमसी यांनी नकार दिला आहे. तसेच पाणी, वीज तोडण्याचे आदेश दिल्याने येथील रहिवासी घाबरून नाईलाजास्तव आपला बोजा-बिस्तरा गुंडाळुन घर सोडून जात आहेत.

याबाबत सर्व रहिवाशांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यमंत्री, आमदार, नगरसेवक, राजकीय पदाधिकारी यांच्या भेटी-गाठी घेऊन यांच्यातून काही मार्ग निघतो का? यासाठी प्रयत्न केले. काही तांत्रिक अडचणींमुळे अर्थात एमआयडीसीच्या जाचक नियमावलीमुळे या इमारतीतील बहुतेक रहिवाशांना भविष्यात नवीन घराचा पुनर्बांधणीत आपल्याला आपली हक्काची घरे मिळतील का? याबद्दल साशंकता वाटते. हे रहिवासी अतिशय गरीब परिस्थितीतील असून त्याचा गैरफायदा केडीएमसी आणि एमआयडीसीचे काही अधिकारी तथाकथित विकासक, बिल्डर या सोसायटीतील एक-दोन सभासद रहिवाशांना पकडून करत आहेत. आम्हाला आमची जागा जिथे आहेत तिथेच घरे द्यावीत. या सोसायटीतील पाच-सहा जणांची नावे मालकी हक्कात येत नाहीत. म्हणून या रहिवाशांनी केडीएमसी आयुक्तांचे एका निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. जर ही इमारत घाईघाईत पाडली तर ऐन पावसाळ्यात रहिवासी बेघर होणार आहेत. या इमारतीच्या जागेवर बांधकाम व्यावसायिक, अधिकारी राजकारणी यांचा डोळा असून दबाव आणून ही इमारत तोडण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप होत आहे.
ही इमारत तोडण्यासाठी सुमारे २० ते २२ लाख रुपये इतकी भरमसाठ फी लादत आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे अगोदरच हैराण झालेल्या गरीब रहिवाशांना न्याय द्या, अशी मागणी त्यांनी केडीएमसी आयुक्तांकडे एका निवेदनामार्फत केली आहे. या इमारतीतील संदनिकाधारकांनी गेली दहा-पंधरा वर्षे शिवसेनेच्यामार्फत सदनिका हस्तांतरण करण्यासाठी आंदोलन केले होते. याकडे रहिवाशांनी लक्ष वेधले आहे. इमारत पाडण्यास आमचा विरोध नाही. मात्र आमचा मालकी हक्क अबाधित रहावा अशी विनवणी या रहिवाशांनी केली आहे. विशेष म्हणजे या इमारतीमध्ये रहाणाऱ्या सदनिकाधारकांची नावे नाहीत, ती नावे हस्तांतरण करण्यासाठी रहिवाशांनी औद्योगिक विकास मंडळाकडे सर्व कागदपत्रे सादर केली आहेत. जोपर्यंत सदनिकांची नावे हस्तांतरित होत नाहीत तोपर्यंत ही इमारत पाडण्यात येवू नये, अशी मागणी रहिवाशांनी आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. या इमारतीची जागा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असल्याने त्या भूखंडाला भविष्यात महत्व येणार आहे. या इमारतीत गेल्या अनेक वर्षांपासून राहणाऱ्या रहिवाशांना आपली हक्काची घरे भविष्यात मिळाली पाहिजेत. विशेष म्हणजे एमआयडीसी किंवा कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीमध्ये अशा अनेक धोकादायक इमारती असताना त्या अद्याप तोडण्यास प्रशासन चाल-ढकल करीत आहे. मात्र ही इमारत धोकादायक ठरवून त्वरित कार्यवाही करणाऱ्यांचा मूळ हेतू काय आहे हे येणाऱ्या काही दिवसांतच स्पष्ट दिसणार आहे.

शंकर-पार्वतीच्या रहिवाश्यांना देशोधडीला लावण्याचा घाट; कथित बिल्डर तथा केडीएमसी अधिकाऱ्यांचे षडयंत्र चव्हाट्यावर

ठाणे :- डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागामधील शंकर पार्वती को-ऑप. हाऊसिंग सोसायटी (RH 98) ही इमारत केडीएमसी व एमआयडीसीने धोकादायक असल्याचे जाहीर केल्याने सदर इमारत येत्या दोन दिवसात तोडून टाकण्यात येणार आहे. तशी तयारी केडीएमसी आणि एमआयडीसीतर्फे करण्यात आली आहे. मात्र या इमारतीतील बेघर होणाऱ्या रहिवाश्यांची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याने प्रशासनाने या रहिवाश्यांना देशोधडीला लावण्याचा जणू घाट घातला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही इमारत पाडण्यासाठी कथित बिल्डर तथा केडीएमसी अधिकाऱ्यांचे षडयंत्र रहिवाश्यांनी चव्हाट्यावर आणले आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांमधील इमारतींची मोजदादच नसल्यामुळे या भागात गेल्या वर्षी किती आणि कोणत्या ठिकाणी धोकादायक इमारती होत्या, याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. मात्र औद्योगिक निवासी विभागातील फेज 2 मधल्या आर एच - 98 या भूखंडावर शंकर पार्वती नामक तळ + 1 मजली ही जुने बांधकाम असलेली इमारत सद्याच्या घडीला अत्यंत जीर्ण झाली आहे. या इमारतीचे ठिकठिकाणी स्लॅबचे प्लास्टर कोसळून आतील गंजलेल्या सळ्या बाहेर पडल्या आहेत. या इमारतीत रहिवासी गेल्या अनेक दिवसांपासून जीव मुठीत धरून वास्तव्य करत आहेत. या इमारतीतील 16 रहिवासी कुटुंबे बेघर होणार असून त्यांना पर्यायी निवारा देण्यास एमआयडीसी व केडीएमसी यांनी नकार दिला आहे. तसेच पाणी, वीज तोडण्याचे आदेश दिल्याने येथील रहिवासी घाबरून नाईलाजास्तव आपला बोजा-बिस्तरा गुंडाळुन घर सोडून जात आहेत. याबाबत सर्व रहिवाश्यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यमंत्री, आमदार, नगरसेवक, राजकीय पदाधिकारी यांच्या भेटी-गाठी घेऊन यांच्यातून काही मार्ग निघतो का यासाठी प्रयत्न केले. काही तांत्रिक अडचणींमुळे अर्थात एमआयडीसीच्या जाचक नियमावलीमुळे सदर इमारतीतील बहुतेक रहिवाश्यांना भविष्यात नवीन घराचा पुनर्बांधणीत आपल्याला आपली हक्काची घरे मिळतील का याबद्दल सर्वशंकता वाटते. सदर रहिवासी अतिशय गरीब परिस्थितीतील असून त्याचा गैरफायदा केडीएमसी आणि एमआयडीसीचे काही अधिकारी तथाकथित विकासक, बिल्डर या सोसायटीतील एक-दोन सभासद रहिवाश्यांना पकडून करण्याची शक्यता येथील रहिवाशांनी बोलून दाखवली. आम्हाला आमची आहे त्याच ठिकाणी जागा (घर) हवी. हे सर्व रहिवासी आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत. त्यातील पाच-सहा जणांची नावे मालकी हक्कात येत नाहीत. म्हणून या रहिवाश्यांनी केडीएमसी आयुक्तांचे एका निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. जर ही इमारत घाईघाईत पाडली तर ऐन पावसाळ्यात रहिवासी बेघर होणार आहेत. या इमारतीच्या जागेवर बांधकाम व्यावसायिक, अधिकारी राजकारणी यांचा डोळा असून दबाव आणून ही इमारत तोडण्याची धमकी दिली जात असल्याचा रहिवाश्यांचा आरोप आहे.

सदर इमारत तोडण्यासाठी सुमारे 20 ते 22 लाख रुपये इतकी भरमसाठ फी सागत आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे अगोदरच हैराण झालेल्या गरीब रहिवाश्यांना न्याय द्या, अशी मागणी त्यांनी केडीएमसी आयुक्तांकडे एका निवेदनामार्फत केली आहे. या इमारतीतील संदनिकाधारकांनी गेली दहा-पंधरा वर्षे शिवसेनेच्यामार्फत सदनिका हस्तांतरण करण्यासाठी आंदोलन केले होते. याकडे रहिवाश्यांनी लक्ष वेधले आहे. इमारत पाडण्यास आमचा विरोध नाही. मात्र आमचा मालकी हक्क अबाधित रहावा अशी विनवणी या रहिवाश्यांनी केली आहे. विशेष म्हणजे या इमारतीमध्ये रहाणाऱ्या सदनिकाधारकांची नावे नाहीत, ती नावे हस्तांतरण करण्यासाठी रहिवाश्यांनी औद्योगिक विकास मंडळाकडे सर्व कागदपत्रे सादर केली आहेत. जोपर्यंत सदनिकांची नावे हस्तांतरित होत नाहीत तोपर्यंत ही इमारत पाडण्यात येवू नये, अशी मागणी रहिवाश्यांनी आयुक्तांना पत्र पाठवून केली आहे.
 
सदर इमारतीची जागा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी (निवासी बस स्टॉप व एमआयडीसी मार्केट) असल्याने त्या भूखंडाला भविष्यात महत्व येणार आहे. या इमारतीत गेल्या अनेक वर्षांपासून राहणाऱ्या रहिवाश्यांना आपली हक्काची घरे भविष्यात मिळाली पाहिजेत. विशेष म्हणजे एमआयडीसी किंवा कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीमध्ये अशा अनेक धोकादायक इमारती असताना त्या अद्याप तोडण्यास प्रशासन चाल-ढकल करीत आहे. मात्र सदर इमारत धोकादायक ठरवून त्वरित कार्यवाही करणाऱ्यांचा मूळ हेतू काय आहे हे येणाऱ्या काही दिवसांतच स्पष्ट दिसणार आहे.

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.