ETV Bharat / state

कॉर्पस फंडच्या नावाने बांधकाम विकासकांनी घातला साडेपाच कोटींचा गंडा; गुन्हा दाखल - mohan society thane

अंबरनाथ शहरात २०१६ मध्ये मोहन सबरविया या नावाने हायप्रोफाईल गृह संकूल उभारण्यात आले होते. त्यावेळी आरोपींनी येथील सदनिकाधारकांना सर्व सुख सुविधेचे आमिष दाखवून त्यांना घरे विकली. मात्र, सांगितल्याप्रमाणे सुख सुविधा देण्यात आल्या नाही. शिवाय कॉर्पस फंडाच्या नावाने रहिवाशांकडून ५ कोटी ६१ लाख ५ हजार रुपये आरोपींनी गोळा केली आणि त्या रक्कमेचा परस्पर अपहार केला.

mohan suburbia fraud thane
मोहन सोसायटी
author img

By

Published : Feb 29, 2020, 8:57 PM IST

Updated : Feb 29, 2020, 9:20 PM IST

ठाणे- एका प्रसिद्ध बांधकाम कंपनीच्या भागीदारांनी मिळून रहिवाशांना कॉर्पस फंडाच्या नावाने साडे पाच कोटी रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अंबरनाथ शहरातील मोहन सबरविया या हायप्रोफाईल सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या रहिवाशांनी मोफा न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या बांधकाम विकासकांवर गुन्हा दाखल केला आहे.

माहिती देताना तक्रारकर्ते

जितेंद्र मोहनदास लालचंदानी, अमित गांधी, दीपक मनचंदासह इतर भागीदार आणि मोहन लाईफ स्पसेस एलएलपी कंपनीचे भागीदार, अशी कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ शहरात २०१६ मध्ये मोहन सबर्बिया या नावाने हायप्रोफाईल गृह संकूल उभारण्यात आले होते. त्यावेळी आरोपींनी येथील सदनिकाधारकांना सर्व सुख सुविधेचे आमिष दाखवून त्यांना घरे विकली. मात्र, सांगितल्याप्रमाणे सुख सुविधा देण्यात आल्या नाही. शिवाय कॉर्पस फंडाच्या नावाने रहिवाशांकडून ५ कोटी ६१ लाख ५ हजार रुपये आरोपींनी गोळा केली आणि त्या रक्कमेचा परस्पर अपहार केला.

दरम्यान, जून २०१६ पासून वेळोवेळी रहिवाशांनी स्थानिक पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रारअर्ज केले. मात्र, त्यावर पोलिसांकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने रहिवाशी मनोहर वजराणी यांनी मोफा न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अखेर अंबरनाथ पोलिसांनी आरोपींविरोधात भा.द.वी कलम ४२०, ४०६, ४०७ आणि मोफा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश करे करीत आहेत.

हेही वाचा- नवी मुंबई पालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुलेंना खंडणीप्रकरणी जीवे मारण्याची धमकी

Last Updated : Feb 29, 2020, 9:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.