ठाणे : रक्षा बंधन सणाच्या पूर्व संध्येला भाऊ बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 18 वर्षीय सख्या भावानं 15 वर्षीय अल्पवयीन बहिणीवर राहत्या घरातच बलात्कार केल्याच्या घटनेमुळं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये आरोपी भावावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
बळजबरीनं राहत्या घरातच बलात्कार : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन बहीण कुटुंबासह भिवंडी तालुक्यातील एका गावात राहते. त्यातच सख्या भावाची वाईट नजर आपल्या बहिणीवर पडल्यानं तो घरात कोणी नसल्याची संधी शोधत होता. अशातच पीडितचे आई वडील घरातून काही कामनिमित्तानं एप्रिल महिन्यात बाहेर गेले होते. त्यावेळी घरात केवळ पीडित बहिणी एकटीच होती. त्यावेळी आरोपीनं राहत्या घरातच बळजबरीनं बहिणीवर बलात्कार केला. या घटनेनं संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पीडिता गभर्वती राहिल्यामुळं घटना उघड : घडलेल्या घटनेमुळं पीडिता भयभीत झाल्यानं तिनं घडलेला प्रकार कोणाला सांगितला नव्हता. त्यामुळं आरोपी भावानं तिच्यावर वारंवार बलात्कार केला. एक दिवस पीडितेला पोटदुखीचा त्रास होत असल्यानं तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी पीडिता गभर्वती असल्याचं तिच्या तपासणी अहवालात दिसून आलं. त्यामुळे या घटनेनं कुटुंबाला धक्काच बसला असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी भावाला अटक : पीडित अल्पवयीन मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असताना पोलिसांनी तिचा रुग्णालयातच जबाब नोंदवला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून कोनगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६,(२), (एन), (२), (एफ) सह पोक्सो कायदा कलम ४, ६, ८, १०, प्रमाणे २९ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पथकानं आरोपी भावाला ताब्यात घेऊन अटक केली आहे. अटक आरोपी भावाला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती गुन्ह्याचा तपास करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा -
- Crime News : मैत्रिणीवर गोड बोलून बलात्कार, अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; आरोपीला पुण्यातून अटक
- Police Raid On Fake Paneer : बनावट पनीरवर पुणेकर मारतात 'ताव'? पोलिसांनी जप्त केलं 4 हजार 970 किलो पनीर
- Angadia Extortion Case : मध्यप्रदेशातील खुनाच्या आरोपीनं मुंबईतील अंगडियांना लावला 6 कोटींचा चुना, न्यायालयानं ठोठावली कोठडी