ठाणे : याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दयानंद गंगाराम पमुला (वय ५६) असे नराधमाचे नाव आहे. तो घटनास्थळावरून फरार झाला आहे. तर अनिल (नाव बदललेले) असे हत्या झालेल्या भावाचे नाव आहे. हल्ल्यात अनिलची आई ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अश्लील इशारे आणि नंतर हत्या : मृत अनिल हा आई आणि दोन बहिणींसोबत राहात होता. तर नराधम आरोपी दयानंद हा मृतकच्या घराशेजारी राहत होता. त्यातच गेल्या १५ दिवसांपासून नराधम दयानंद हा मृतकच्या दोन बहिणी दरात उभ्या दिसल्या की, त्यांना अश्लील इशारे करायचा. याचप्रमाणे १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास मृतकची आई तिच्या मुलीसह राहत्या घराच्या प्रवेशद्वारासमोर उभी राहिली. यावेळी आरोपी दयानंदने त्याच्या गॅलरीत उभे राहून तिला अश्लील इशारे केले. यामुळे आई आणि पीडित मुलगी या अश्लील कृत्याचा जाब विचारण्यासाठी नराधमाच्या घरासमोर गेल्या. आरोपीला या गोष्टीचा राग आल्याने त्याने महिलेला लाकडी दांड्याने मारहाण केली. भांडणात मृतक अनिल मध्ये पडल्याने आरोपीने धारदार शस्त्राने त्याची हत्या केली.
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल : घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मृतक अनिलच्या देहाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. तर गंभीर जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमी महिला (मृतकची आई) शुद्धीवर आल्यानंतर नराधम दयानंद याच्या विरोधात भादंवि कलम ३०२, ३०७, ३५४(अ) आणि पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागताच नराधम दयानंद घटनास्थळावरून पसार झाला आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि आर.पी.दराडे करीत आहेत.
जुन्या वादातून खून : टोकाला गेलेल्या जुन्या वादातून झालेल्या सशस्त्र हाणामारीत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मेहुणा-भावोजी असे दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगरमध्ये 19 सप्टेंबर, 2020 रोजी घडली होती. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून काही तासांतच पाचही हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या.
गुन्हा दाखल: सर्व हल्लेखोर डोंबिवलीतील दत्तनगर परिसरात राहणारे होते. या पाच जणांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात शिवाजी वामन खंडागळे (25) हा तरुण जागीच ठार झाला. तर संतोष विलास लष्करे (34) व राजू धोत्रे हे मेहुणा-भावोजी गंभीर जखमी झाले होते. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या संदर्भात राजू शिवराम धोत्रे (29) याच्या जबानीवरून रामनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा : Breaking News : मेघवाडीत केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या पप्पूचा जीवघेणा हल्ला