मीरा भाईंदर (ठाणे) - 20 हजार रुपयाची लाच घेताना उत्तन येथील तलाठ्यास रंगेहात पकडण्यात आले आहे. लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली.
उत्तन येथील तलाठी कार्यालयात लाचलुचपत विभागाने छापा टाकला. यावेळी अशरफ मोहम्मद यांच्या तक्रारीवरून तलाठी उत्तमराव शेडगे व समीर भुजाव या खासगी व्यक्तीमार्फत 65 हजार लाच घेण्याची बोलणी केली होती. प्रथम हप्ता २० हजार रुपये तलाठी कार्यालयात घेताना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. सदरील लाचेमध्ये भागीदारी म्हणून दीपक अनारे मंडळ अधिकारी भाईंदर व भाईंदर अप्पर तहसीलदार नंदकिशोर देशमुख यांचीही नावे समोर येत आहेत. भाईंदरच्या उत्तन येथील असलेल्या तलाठी कार्यालयात तपासणी व पंचनामे सुरू आहेत.