ETV Bharat / state

Blood Donation Camp For Pet Dog : भिवंडीत श्वानाच्या वाढदिवसानिमित्त चक्क 'रक्तदान शिबीर'

भिवंडी शहरात 'पोट्स' नावाच्या पाळीव श्वानाच्या वाढदिवसाला ( Blood donation camp for pet Dog birthday Bhiwandi ) एका मोठ्या हॉलमध्ये मोठ्या थाटात चाहत्याकडून रक्तदान करून साजरा करण्यात आला. शिवाय केक कापून व छत्रपती शिवरायांचा 'पोट्स' आशीर्वाद घेऊन वाढदिवस साजरा केला.

रक्तदान शिबीर भिवंडी
रक्तदान शिबीर भिवंडी
author img

By

Published : Apr 17, 2022, 6:50 PM IST

Updated : Apr 17, 2022, 7:03 PM IST

ठाणे - आजपर्यंत आपण राष्ट्रीय पुरुष, नेते, अभिनेत्यांचे किंवा प्रसिद्ध व्यक्तींचा वाढदिवस अथवा जयंती निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन केल्याचे पाहिले आहेत. मात्र भिवंडी शहरात 'पोट्स' नावाच्या पाळीव श्वानाच्या वाढदिवसाला ( Blood donation camp for pet Dog birthday Bhiwandi ) एका मोठ्या हॉलमध्ये मोठ्या थाटात चाहत्याकडून रक्तदान करून साजरा करण्यात आला. शिवाय केक कापून व छत्रपती शिवरायांचा 'पोट्स' आशीर्वाद घेऊन वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे सामाजिक बांधिलकीतून महाराष्ट्रात पहिल्यादांच श्वानाच्या वाढदिवसाला रक्तदान करून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया देताना आयोजक

भिवंडी शहरातील ज्ञानराजा जनकल्याण संस्था आणि मी भिवंडीकर संकल्प रक्तदानाचा यांच्या संयुक्त संकल्पनेतून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. भिवंडीतील मोहन पठाडे हे गेल्या तीन वर्षांपासून पाग जातीच्या श्वानाचे पालन-पोषण करतात. 'पोट्स'ला तीन वर्षांपूर्वी त्यांच्या एका मैत्रणीने गिफ्ट स्वरूपात दिले होते. तेव्हापासून जीवापाड प्रेम करत घराच्या सदस्यासारखी त्या श्वानाची देखभाल करतात. 'पोट्स'च्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोहन पठाडे यांनी भिवंडीतील पार्वती मंगल कार्यलयात वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फ्लेक्स लावले होते. त्यात 'पोट्स'चे प्रेम करणाऱ्या बहुतांश तरुणांनी त्याला आशीर्वाद देऊन रक्तदान केले आहे.

अन्नदान करुन केले वाढदिवस साजरे : 'पोट्स' तीन वर्षाचा झाल्यानंतर वाढदिवसाच्या दिवशी खास कार्यक्रमही साजरा करण्यात आला. यामध्ये 'पोट्स'चे औक्षण करून ओवाळण्यात आले आणि घरच्या सदस्यांसह कॉग्रेसचे नगरसवेक प्रशांत लाड, साई संस्थांच्या डॉ. स्वाती खान यांच्या हस्ते केक कापून आनंद साजरा केला. 'पोट्स'च्या अशा अनोख्या वाढदिवसाची चर्चा भिवंडी शहरात पसरली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या वाढ दिवसामध्ये लॉकडाऊन होता. त्यावेळी गरीब गरजूना अन्नधान्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा - Hindu Muslim Unity : वाशिम कारागृहात 32 हिंदू - मुस्लिम कैद्यांनी ठेवले रोजे

Last Updated : Apr 17, 2022, 7:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.