ETV Bharat / state

Thane Crime: रमजानमध्ये 'शेवय्यां'चा काळाबाजार; दोन ट्रकभर 'शेवय्यां'वर माफियांनी ओतले पाणी - रमजानमध्ये शेवय्यांचा काळाबाजार

रमजानच्या महिन्यात शेवय्याचा काळाबाजार होत असल्याने त्याचे दर दुपट्टीने वाढले आहे. त्यामुळे एका व्यापाऱ्याने बनारसहून दोन ट्रक भरून शेवय्याचे बॉक्स स्वत दरात विक्रीसाठी आणले होते; मात्र माफियांना याची खबर मिळताच त्यांनी दोन्ही ट्रकचा पाठलाग करत ट्रक चालकांना नाशिक-मुंबई महामार्गावरील पडघा टोलनाका येथे अडविले आणि बंदुकीचा धाक दाखवून बेदम मारहाण केली. शिवाय ट्रक सर्व्हिस सेंटरवर नेऊन दोन्ही ट्रकमधील 'शेवय्यां'वर पाणी ओतल्याने व्यापाऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Thane Crime
खराब झालेल्या शेवय्या
author img

By

Published : Apr 15, 2023, 5:35 PM IST

पाण्याने भिजलेल्या शेवय्या दाखविताना कामगार

ठाणे: भिवंडीतील काही 'शेवय्या'चा घाऊक विक्री करणाऱ्या माफियांनी अचानक गेल्या २० दिवसांपासून १०० ते १२५ रुपये किलो दराने मिळणारी शेवय्याचे दर दुप्पट करून त्याचा काळाबाजार सुरू केला आहे. याच काळाबाजाराची चर्चा भिवंडी शहरात होत असल्याचे पाहून शेवय्याच्या एका व्यापाऱ्याने उत्तरप्रदेशमधील बनारस शहरातून दोन ट्रक कच्च्या शेवय्या भिवंडी शहरात १०० रुपये किलो दराचे विक्रीसाठी आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १० एप्रिल रोजी दोन ट्रक भरून शेवय्याचे बॉक्स घेऊन निघाले.

माफियांची अशीही करामत: १३ एप्रिल रोजी दुपारी दोन्ही ट्रक मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा टोलनाका येते आल्याची खबर काळाबाजार करणाऱ्या माफियांना लागली होती. त्यानंतर दोन कारमधून आलेल्या ४ अज्ञात आरोपींनी दुपारच्या सुमारास ट्रकचा पाठलाग करत दोन्ही ट्रक महामार्गावरील शिवसागर हॉटेलजवळ अडवले. ट्रक थांबताच अज्ञात आरोपीने ट्रक चालकास बंदुकीचा धाक दाखवून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. शिवाय ट्रकच्या चाव्या आणि दोन्ही चालकांचे मोबाईल फोन हिसकावून घेत त्यांना बेदम मारहाण केली. आरोपींनी दोन्ही ट्रक नजीकच्या सर्व्हिस सेंटरवर नेले आणि शेवय्यांच्या बॉक्सवर पाण्याचे फवारे मारून संपूर्ण शेवय्या भिजवल्या. त्यामुळे शेवय्या आणणाऱ्या व्यापाऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

आरोपींचा शोध सुरू: दोन्ही ट्रक पुन्हा आल्या मार्गाने जात असतानाच, माफिया आरोपींनी पाठलाग केला; मात्र कसारा चेकपोस्टवर दोन्ही ट्रक पथकाने तपासणीसाठी अडवले असता, त्या ठिकाणावरून आरोपींनी कारमधून पळ काढला. तर दुसरीकडे ट्रक अद्यापही भिवंडी शहरात आले नसल्याचे पाहून ट्रकवरील जीपीएस लोकेशनवरून ट्रक मालक आणि शेवय्याचे व्यापारी घटनास्थळी आले. त्यानंतर १४ एप्रिल रोजी ट्रकचालक नितेशकुमार रामकेशव यादव (२८) यांच्या तक्रारीवरून पडघा पोलीस ठाण्यात अज्ञात ४ आरोपीं विरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. आता पोलिसांनी अज्ञात आरोपींचा मुंबई-नाशिक महामार्गवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा: Rahul Gandhi Bhiwandi Case : राहुल गांधींवरील भिवंडीतील मानहानी दाव्याच्या सुनावणीतून कायमची सूट, पुढील सुनावणी ३ जूनला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.