ETV Bharat / state

कोरोनाचे गांभीर्य नाहीच.. भाजप शहराध्यक्ष विना मास्कच करताहेत पदनियुक्ती - आरोग्य प्रशासन

कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य प्रशासन, पोलीस यंत्रणेसह विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था आपल्या परीने मदतकार्यात सक्रीय आहेत. असे असताना कल्याणातील भाजपा शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे हे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या पदनियुक्त्या करण्यात व्यस्त असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

कोरोनाच्या संकटात भाजपा शहरध्यक्षाचा प्रताप

author img

By

Published : Apr 16, 2020, 9:44 AM IST

ठाणे - जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले असून आपला देशही कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. अशात कल्याण शहरातील भाजप पदाधिकारी मात्र पदनियुक्तीमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले. याबाबत सोशल मिडीयावर नेटकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून नागरिकांनी भाजपच्या या पदनियुक्तीवर सडकून टीका केली आहे.

एकीकडे देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मुंबईमध्ये तर कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यातच कल्याण डोंबिवलीतही कोरोना रुग्णांची संख्या ५८ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य प्रशासन, पोलीस यंत्रणेसह विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था आपल्या परीने मदतकार्यात सक्रीय आहेत. असे असताना कल्याणातील भाजपा शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे हे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या पदनियुक्त्या करण्यात व्यस्त असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावर नागरिकांनी संताप व्यक्त करत टीकाही केली आहे.

कल्याणमधील महेश जाधव या सामाजिक कार्यकर्त्याने केलेल्या कार्याची दखल घेत भाजप शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी जाधव यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. कल्याण शहरामध्ये कोरोनाची परिस्थिती पाहून, मी कल्याण शहर अध्यक्ष ह्या नात्याने कामाची दखल घेत महेश किरण जाधव यांची कल्याण शहर उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करत आहे.' अशा आशयाचे नियुक्ती पत्र त्यांनी दिले. हे नियुक्तीपत्र देताना दोघांनीही मास्कचा वापर केलेला फोटोमध्ये दिसत नाही.

देश कोरोनाच्या संकटाशी सामना करत असताना भाजप शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांना या नियुक्तीची एवढी घाई का ? असा सवाल नागरिक करत आहेत. अशा पध्दतीने मदत कार्यातदेखील राजकीय स्वार्थ जपून नागरिकांच्या भावनांशी क्रूर चेष्टा करणाऱ्या शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्यावर पक्ष नेतृत्व आणि प्रशासन काय कारवाई करणार, असा सवाल करत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान याबाबत भाजपा शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांना विचारले असता, त्यांनी ही नियुक्ती आधीच झाली असल्याचे सांगत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.