ETV Bharat / state

महावितरण कार्यालयाला टाळे न ठोकताच भाजपचे आंदोलन मागे

वाढीव वीज बिलाविरोधात आणि लॉकडाऊन काळातील वीजबिलं माफ करावीत या मागणीसाठी, आज राज्यभरात भाजपच्या वतीने महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले. मात्र मुरबाडमध्ये टाळे न ठोकताच आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

महावितरण कार्यालयाला टाळे न ठोकताच भाजपचे आंदोलन मागे
महावितरण कार्यालयाला टाळे न ठोकताच भाजपचे आंदोलन मागे
author img

By

Published : Feb 5, 2021, 8:08 PM IST

ठाणे - वाढीव वीज बिलाविरोधात आणि लॉकडाऊन काळातील वीजबिलं माफ करावीत या मागणीसाठी, आज राज्यभरात भाजपच्या वतीने महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले. मात्र मुरबाडमधे महावितरण कंपनीच्या विरोधात भाजपने पुकारलेल्या टाळे ठोको आंदोलनाला पोलिसांनी हात जोडताच महावितरण कार्यालयाला टाळे न ठोकताच आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनाला केवळ 30 ते 35 कार्यकर्त्यांची उपस्थिती

मुरबाड मतदारसंघात भाजपचे आमदार किसन कथोरे हे दुसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर विधासभेत निवडणून आले. मुरबाड तालुक्यातील पंचयात समिती, नगरपंचात आणि सर्वात जास्त ग्रामपंचाती भाजपच्या ताब्यात आहेत. मात्र असे असताना आजच्या आंदोलनाला केवळ 30 ते 35 कार्यकर्त्यांचीच उपस्थिती होती.

महावितरण कार्यालयाला टाळे न ठोकताच भाजपचे आंदोलन मागे

आंदोलनात कुठेच हल्लाबोल नाही

महावितरण कंपनीने ७५ लाख ग्राहकांना नोटीसा दिल्याच्या विरोधात, आज मुरबाडमधे भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात महावितरण कार्यालयवर हल्लाबोल टाळा ठोको आंदोलन पुकारले होते. मात्र आंदोलनादरम्यान कुठेच हल्लाबोल दिसून आला नाही. सरकारविरोधात घोषणाबाजी करताना आंदोलक हसत असल्याचे दिसून आले. त्यामुळे हे आंदोलन परिसरात चर्चेचा विषय बनले. दरम्यान टाळे न ठोकताच केवळ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन हे आंदोलन मागे घेण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.