ठाणे - एनसीबीचे अधिकारी समीर वानखडेंचा वापर करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव केंद्र सरकार करीत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. (nana patole alleged on modi gov over sameer wankhede) कल्याणमध्ये काँग्रेसकडून जनजागरण यात्रेचे (congress janjagran yatra kalyan) आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (nana patole in kalyan)
भाजपने हे काम थांबवावे -
ज्या-ज्या वेळी निवडणुका आल्या की, केंद्रातील भाजप सरकार ईडी, सीबीआय या केंद्रीय संस्थांमधील अधिकाऱ्यांना पुढे करून विरोधी पक्षातील नेत्यांना बदनाम करीत आहे. हे महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे आता बदनामीचे काम भाजपवाल्यांनी थांबवावे, असे ते म्हणाले.
पवार विरुद्ध फडणवीसांच्या वादात काँग्रेसला रस नाही -
गेल्या ३ दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार विरुद्ध विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात वैयक्तिक जीवनातील वादविवाद सुरू आहे. मात्र, या दोघांच्या वादात काँग्रेसला अजिबात रस नसल्याचे सांगत नाना पटोले यांनी यावर भाष्य करणे टाळले. तर भाजपला हिंदू-मुस्लिमांशी काही घेणे देणे नाही. ते केवळ सत्ता टिकविण्यासाठी आरोप-प्रत्यारोप करून दोन्ही समाजात दुही निर्माण करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.