ठाणे - राज्य सरकारकडून ठाण्यात रुग्णांची हेळसांड करण्यात येत असल्याचा आरोप करत, आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन केले. यावेळी भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून राज्य सरकारचा निषेध केला.
ठाण्यात फक्त हजारो बेड्स नकोत तर पुरेसे डॉक्टर, नर्सेस आणि रुग्णवाहिका हव्यात, जेणेकरून रुग्णांना तासनतास वाट पाहावी लागणार नाही, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले. रुग्णवाहिका वेळेवर मिळाली नाही म्हणून रुग्णांना रस्त्यातच प्राण सोडावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. ही बाब राज्य सरकारसाठी अत्यंत लाजिरवाणी असल्याचेही, ते म्हणाले.
या आंदोलनात आमदार निरंजन डावखरे यांच्यासह आमदार संजय केळकर, महिला आघाडीच्या मढवी नाईक, नगरसेवक संदीप लेले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा - श्रमिकांसाठी पोलीस प्रशासन सज्ज; तब्बल 60 हजार ई-पासेसद्वारे दीड लाख नागरिकांची पाठवणी
हेही वाचा - कल्याण-डोंबिवलीत २४ तासात ५७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद