ETV Bharat / state

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यावर भाजप आमदार-मंत्र्यांचा दावा, पहा कोण काय म्हणाले?

कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा मुलगा श्रीकांत शिंदेच्या जागेवर भाजप नेत्याकडून दावा ठोकण्यात आल्यानंतर भाजपचे आमदार संजय केळकर आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपचाच किल्ला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शिंदे गट व भाजपमध्ये ठाण्याच्या जागेवरून फिस्कटल्याचे दिसत आहे.

BJP leader Girish Mahajan
भाजप नेते गिरीश महाजन
author img

By

Published : Jun 13, 2023, 9:50 AM IST

, सुशासन आणि गरीब कल्याणावर भर द्यावा- भाजप नेते गिरीश महाजन

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील लोकसभेच्या जागांवरून शिंदे गट आणि आणि भाजप यांच्यातील वाद कायम आहे. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्यावर भाजपचा दावा असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की मोदींच्या लाटेमुळे 2014 पासून आमच्या मित्रपक्षांसह ठाणे जिल्ह्यातून अनेकजण विजयी झाले आहेत. ते मोदी@९ अंतर्गत महा-जनसंपर्क अभियानानिमित्ताने भाजपच्या वतीने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मेळाव्यात रविवारी बोलत होते.

भाजपचे आमदार संजय केळकर म्हणाले, की येथे भाजपशिवाय कोणीही निवडून येऊ शकत नाही. जेव्हा लोक (सेना) ठाण्यातील जागांवर आपला अधिकार सांगू लागतात. तेव्हा मला आश्चर्य वाटते. ते गैरसमज बाळगून असल्याची अप्रत्यक्ष टीका भाजपचे आमदार संजय केळकर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केली आहे. ठाणे लोकसभेच्या जागेवरून श्रीकांत शिंदे यांनी नुकतेच राजीनामा देण्याची तयारी केली होती.

प्रत्येक बूथवर ५१ टक्के मते मिळविण्याचे लक्ष्य ठेवावे ठाणे लोकसभा मतदारसंघात २३०० बूथ आहेत. आगामी निवडणुकीत प्रत्येक बूथवर ५१ टक्के मते मिळविण्याचे लक्ष्य ठेवून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एका बूथची ओनरशिप घ्यावी. भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले श्री राम जन्मभूमी मंदिर, ३७० कलम हटाव सारखे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले आहे. यापुढील काळात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणावर भर द्यावा, असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाचे सूत्र पकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्य करीत आहेत.

ठाणे जिल्हा हा भाजपचाच बालेकिल्ला-रवींद्र चव्हाणठाणे जिल्हा हा भाजपचाच बालेकिल्ला असून भाजपचाच किल्ला मजबूत करण्यासाठी आता कार्यकर्त्यांनी बुथवरील लढाई लढावी. पक्षाच्या दृष्टीने येत्या निवडणुकीत देशात भाजपाची ताकद विरोधकांना दाखवायची आहे. सध्या काळ सचोटीचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, बुथवरील लढाई कार्यकर्त्यांनी लढावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

प्रत्येक योजना ही समाजाच्या तळागाळातील कुटुंबांसाठी आहे. प्रत्येक कुटुंबाच्या विकासाबरोबरच नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगतीही वेगाने होत आहे. - भाजप नेते गिरीश महाजन

मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती : अंत्योदयानुसार प्रत्येक कुटुंबाचा विकास करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटावे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच क्षेत्रात अनेक कामे केली. भारताच्या प्रगतीचे अरब राष्ट्रांकडूनही कौतुक होत आहे. तर पाकिस्तानातील सामान्य जनतेला मोदींच्या कार्याविषयी उत्सूकता आहे, असे महाजन यांनी नमूद केले. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक सेवाभावी योजना प्रत्येक कार्यकर्त्यांने दररोज वेळ काढून समाजापर्यंत पोहचवाव्यात, असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले.

सर्वच नेते विरोधकांवर आक्रमक : देशात नऊ वर्षांत मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झाले. मोदी सरकारमुळेच प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात बदल घडले आहेत, असे मत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले. देशातील विषमता दूर होऊन समानतेकडे वाटचाल सुरू झाली असल्याचे आमदार गणेश नाईक यांनी नमूद केले. तर २०२४- मोदी की बडी जीत या घोषणेसह कार्यकर्त्यांनी कार्य करावे, असे आवाहन माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केले.

विकासाबरोबरच अनेक सुधारणा : गेल्या ९ वर्षांत नरेंद्र मोदींनी भारताला ताकद दिली. हजारो कोटी रुपयांच्या विकासाबरोबरच अनेक सुधारणा केल्या. आता महा-जनसंपर्क अभियानातून भाजपाला महाविजय मिळवायचा आहे, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी प्रास्ताविक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आर्थिक क्रांती होण्याबरोबरच सामान्य व्यक्तीही अर्थव्यवस्थेला जोडला गेला. भारताच्या आर्थिक क्षमतेबरोबरच परदेशात भारतीयांच्या प्रतिष्ठेतही वाढ झाली, असे आमदार डावखरे यांनी नमूद केले.

हेही वाचा :

  1. Kalyan Lok Sabha : कल्याण लोकसभेवरून स्थानिक भाजप-शिंदे गटात खदखद, भाजपचे राष्ट्रीय नेते म्हणतात सर्वच अलबेल!
  2. Sanjay Raut On Cm : संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, चार मंत्र्यांची गच्छंती होणार असल्याचा दावा
  3. Sharad Pawar Death Threat : शरद पवारांना धमकी देणाऱ्या तरुणाचे हिंदुत्ववादी संघटनेशी संबंध..पुण्यातून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.