ETV Bharat / state

शिवसेना भगवा सोडून हिरवा झेंडा हातात घेईल; भाजप आमदार अतुल भातखळकरांची टीका - bjp mla atul bhatkhalkar pc thane

ईडी आणि सीबीआयला सिमेवर पाठवा, असे विनोदी सल्ले देणे आमचे काम नाही. यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात पाठवा, त्यामुळे निदान जनतेचे काम तरी होईल, असा संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिहल्लाही भातखळकर यांनी केला.

bjp mla atul bhatkhalkar
भाजपा आमदार अतुल भातखळकर
author img

By

Published : Nov 30, 2020, 8:30 PM IST

ठाणे - शिवसेना हा पक्ष एमआयएमचे प्रमुख ओवैसी यांच्यापेक्षाही धर्मनिरपेक्ष बनण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी काळात शिवसेना खांद्यावरील भगवा सोडून हिरवा झेंडा हातात घेईल, अशी टीका भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली. तसेच बाळासाहेबांचे हिंदुत्व यांनी कधीच संपवले आहे. त्यामुळे आगामी दसरा मेळाव्याला जय भवानी, जय शिवाजी ऐवजी नवीन नारे दिले जातील, असा घणाघातही भातखळकर यांनी शिवसेनेवर केला. ते येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपा आमदार अतुल भातखळकर पत्रकार परिषदेत बोलताना.

महाविकास नाही तर महाभकास आघाडी -

ईडी आणि सीबीआयला सिमेवर पाठवा, असे विनोदी सल्ले देणे आमचे काम नाही. यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात पाठवा, त्यामुळे निदान जनतेचे काम तरी होईल, असा संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिहल्लाही भातखळकर यांनी केला. हे महाभकास आघाडी असा सरकारचा उल्लेख करुन महाभकास आघाडी सरकारचे १ वर्ष म्हणजे तबोयुग असल्याची टिका केली.

राज्य स्थापन झाल्यापासून राज्याने पहिले असे मुख्यमंत्री पाहिले जे मंत्रालयात गेलेच नाहीत. एकही निर्णय या मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या हिंमतीवर केलेला नाही. एकाही कोविड सेंटरला भेट न देणे आणि जनतेला न भेटणे हा विक्रम सुद्धा मुख्यमंत्री ठाकरेंनी केला आहे. तसेच विठ्ठलाच्या पुजेचे तिर्थ हातावर न घेणं आणि विठ्ठलाच्या मुर्तीला स्पर्श न करणे हा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे.

हेही वाचा -

सर्वच बाबतीत राज्य सरकार विफल -

तर मराठा आरक्षण या सरकारला टिकवायचे नाही. त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवता आला नाही, राज्याला कोविड कॅपिटल बनवले, कोविडच्या काळात सर्वात जास्त मृत्यू दर वाढवण्याचे काम असेल की कोविडच्या काळात बोल्या लावून बदल्या करण्याचे काम असेल, असे अनेक दुष्कर्म या सरकारच्या काळात झाले, अशी टीकाही भातखळकर यांनी केली. दरम्यान, सर्वच बाबतीत हे सरकार विफल असे सरकार आहे, असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला.

हेही वाचा - अजान स्पर्धेशी माझा काहीही संबंध नाही, मी स्पर्धेचे आयोजन केलेले नाही - पांडुरंग सपकाळ

कोविड काळात आतापर्यंत प्रत्येकी एक ठाणेकर या हिशोबाने फक्त ६०० रुपयेप्रमाणे फक्त ६८ लाख रुपये या राज्य सरकारने ठाण्याला दिले. कोविड काळात वाटप करण्याकरता राज्य सरकारने आणि ठाणे महानगरपालिकेने दिलेले धान्य शिवसेना आणि राष्ट्रवादी आपल्या घरी घेवुन गेली. याची लाचलुचपत खात्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच ईडी जर अन्याय करत असेल तर क्वारंन्टाईन होण्यापेक्षा न्यायालयात जा, असा टोला अतुल भातखळकर यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना लगावला आहे.

उद्धव ठाकरे म्हणजे यू-टर्न -

राज्याचे मुख्यमंत्री ज्यांच्या नावात यूटी आहे. म्हणून ते सारखे यूटर्न मारतात, असा खोचक टोलाही अतुल भातखळकर यांनी लगावला. अनेकदा सरकारने आदेश काढून मागे घेतल्याचे सांगत सरकार कोणत्याही भूमिकेवर ठाम राहत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.