ETV Bharat / state

'आमदार प्रताप सरनाईकांनी घोटाळ्यातील रक्कमेतून ७८ एकर जमीन केली खरेदी' - आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर आरोप

भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर आरोपांचा भडिमार सुरू केला आहे. कल्याणमध्ये तहसीलदारांच्या भेटीसाठी आलेल्या सोमैय्यांनी आणखी एक गंभीर आरोप सरनाईक यांच्यावर केला असून 'एनएसीएल'मधील २५० कोटी रुपये आमदार सरनाईक आणि त्यांचा जोडीदार मोहीत अग्रवाल यांनी घोटाळा करून त्या रक्कमेतून टिटवाळा नजीक ७८ एकर जागा घेतली, असा आरोप करीत खळबळ उडवून दिली आहे.

आमदार प्रताप सरनाईक
आमदार प्रताप सरनाईक
author img

By

Published : Dec 17, 2020, 8:01 PM IST

ठाणे - सक्तवसुली संचलनालयाकडून चौकशी सुरू झाल्यापासून भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेचे प्रवक्ते, आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. विशेषतः भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांनी तर दरदिवसा आड सरनाईक यांच्यावर आरोपांचा भडिमार सुरू केला आहे. आजही कल्याणमध्ये तहसीलदारांच्या भेटीसाठी आलेल्या सोमैय्यांनी आणखी एक गंभीर आरोप आमदार सरनाईक यांच्यावर केला असून 'एनएसीएल'मधील २५० कोटी रुपये आमदार सरनाईक आणि त्यांचा जोडीदार मोहीत अग्रवाल यांनी घोटाळा करून त्या रक्कमेतून टिटवाळा नजीक ७८ एकर जागा घेतली, असा आरोप करीत खळबळ उडवून दिली आहे.

ठाणे
प्रताप सरनाईक यांच्यावर उद्या गुन्हा दाखल करणार

ठाण्यातील रेमंड कंपनीसमोर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी 13 मजल्याचे दोन टॉवर बांधले आणि 'ओसी' न घेताच सर्व सदनिकांची विक्री केली, असा आरोप सोमैय्या यांनी केला. 2008 साली ठाणे पालिकेने सदर बांधकामाला अनधिकृत ठरवले व तोडकाम कारवाईचे आदेश दिले. परंतु, आजतागायत त्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. प्रताप सरनाईक यांनी सामान्य नागरिकांची फसवणूक केली असून, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील केली. त्याच अनुषंगाने शुक्रवारी सोमैय्या ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात सरनाईक यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले.

आमदार सरनाईक यांच्या १०० कोटींच्या दाव्यावर पलटवार

भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी जी काही माझी बदनामी सुरू केली आहे, त्याच्याविरोधात आता थेट न्यायालयात १०० कोटींचा अब्रु नुकसानाची दावा ठोकणार असल्याचे आमदार सरनाईक यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले. याच दाव्याविषयी सोमैय्यांनी आमदार सरनाईकांवर पलटवार करीत हिम्मत असेल त्यांनी दावा दाखल करूनच दाखवावा, असा पलटवार केला. त्यामुळे आमदार सरनाईक विरुद्ध किरीट सोमैय्या या दोघांमध्ये येत्या दिवसात आणखीन दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्याआरोप पहावयास मिळणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.