ETV Bharat / state

भाजप पदाधिकाऱ्याचा प्रताप; अत्याचार पीडित तरुणीच्या दुचाक्या जाळल्या - संदीप गोपीनाथ माळी भाजप

भाजप कल्याण  शहर जिल्हा उपाध्यक्ष संदीप गोपीनाथ माळी (वय 41)याला अल्पवयीन तरुणीवर ४ वर्षे अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 45 दिवसांनी त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्याने तरुणीला गुन्हा मागे घेण्यासाठी धमक्या देणे सुरू केले. येथेच न थांबता त्याने तरुणीच्या घराबाहेरील गाड्या जाळल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

bjp
आरोपी संदीप गोपीनाथ माळी
author img

By

Published : Dec 9, 2019, 8:55 PM IST

ठाणे - अल्पवयीन तरुणीवर ४ वर्षे अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या भाजप पदाधिकाऱ्याने तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तरुणीच्या घराबाहेर तिच्या दुचाक्या जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजप कल्याण शहर जिल्हा उपाध्यक्ष संदीप गोपीनाथ माळी (वय 41), असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित तरुणीने प्रसारमाध्यमांसमोर केल्याने खळबळ माजली होती. गेल्या ४ वर्षांपासून तो बंदुकीचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देत 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार करीत होता. यासंदर्भात पीडित तरुणीने पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती. पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून गुन्हे शाखेने संदीप माळी याला शनिवारी 17 ऑगस्टला पाहाटे महाबळेश्वर येथील हॉटेलमधून ताब्यात घेतले होते. मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले असता 45 दिवसांनी त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्याने तरुणीला गुन्हा मागे घेण्यासाठी धमक्या देणे सुरू केले. येथेच न थांबता त्याने तरुणीच्या घराबाहेरील गाड्या जाळल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये ५ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

पीडित तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात आठवड्यापूर्वी तक्रार दाखल केली होती. चौकशी करून कारवाई करू, असे पोलीस सांगत असल्याचे पीडित तरुणीने प्रसारमाध्यमांसमोर कथन केले होते. देशभरात वातावरण खराब असल्याचे कारण देत पोलीस या प्रकरणाबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. उन्नाव घटनेसारखे मला जाळल्यानंतर पोलीस कारवाई करणार का, असा उद्विग्न सवाल या तरुणीने उपस्थित केला होता.

तर, दुसरीकडे, 'दीड कोटी रुपये दे, प्रकरण मिटवून टाकू' अशी मागणी संबंधित तरुणी आणि तिच्या आईने केल्याचा आरोप संदीप माळी याने केला आहे. त्यानेही मानपाडा पोलीस ठाण्यात तरुणीविरुद्ध खंडणी मागत असल्याची तक्रार केली आहे. दोघांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार केली असली, तरी संदीप माळी याच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीबाबत भाजपने अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Intro:kit 319Body:भाजप पदाधिकाऱ्याचा प्रताप; अत्याचार पिडीत तरुणीच्या दुचाक्या जाळल्या; पीडितेची पोलिसात तक्रार

ठाणे : भाजप कल्याण ग्रामीण मंडळ उपाध्यक्ष याने आपली दुचाकी जाळली अशी तक्रार 19 वर्षीय पिडीत तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे. खळबळजनक बाब म्हणजे याच भाजपाच्या पदाधिकाऱ्याला तक्रारदार अल्पवयीन तरूणीवर चार वर्षे अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप पिडीत तरूणीने प्रसारमाध्यमांच्या समोर केल्याने खळबळ माजली आहे. संदीप गोपीनाथ माळी (41) असे भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
आरोपी संदीप माळी हा भाजपचा कल्याण शहर जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहे. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून, ठार मारण्याची धमकी देत 19 वर्षीय तरुणीवर गेल्या चार वर्षापासून अत्याचार करीत होता. या संदर्भात पिडीत तरुणीने पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे कैफियत मांडली होती. पोलिस आयुक्तांच्या आदेशांनुसार क्राईम ब्रँचने गुंड संदीप माळी याला शनिवारी 17 ऑगस्ट रोजी पहाटे महाबळेश्वर येथील हॉटेलमधून ताब्यात घेऊन मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले होते. 45 दिवसांनी तुरूंगातून सुटका झाल्यानंतर त्याने पिडीत तरुणीच्या पाठी गुन्हा मागे घेण्यासाठी ससेमिरा लावला. धाक-धमक्या देणे सुरू ठेवले. इथेच न थांबता त्याने पिडीत तरूणाच्या घराबाहेरील गाड्या जाळल्याचा आरोप तिने केला आहे. या संदर्भात पिडीत तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात आठवड्यापूर्वी संदीप माळी याच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला. त्यात संदीप माळी याने आपल्या दुचाक्या जाळल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी संदीपवर कोणतीही कारवाई केली नाही. चौकशी करून कारवाई करू असे पोलिस सांगत असल्याचे पिडीत तरूणीने प्रसारमाध्यमांसमोर कथन केले.
देशभरात वातावरण खराब असल्याचे कारण देत पोलिस या प्रकरणाबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. उन्नाव घटनेसारखे मला जाळल्यानंतर पोलिस कारवाई करणार का, असा उद्विग्न सवाल उपस्थित केला आहे. तर दीड कोटी रुपये दे, केस मिटवून टाकू, अशी मागणी सदर तरूणी आणि तिच्या आईने केल्याचा आरोप संदीप माळी याने केला आहे. त्यानेही मानपाडा पोलीस ठाण्यात पिडीत तरुणीच्याविरुद्ध खंडणी मागत असल्याची तक्रार केली आहे. दोघांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार केली असली तरी या प्रकरणातील बहुचर्चित आरोपी संदीप माळी याच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली. मात्र मोठ्या बहुचर्चित कांडात अडकलेल्या या आरोपीबाबत भाजपाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Conclusion:manpada
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.