ETV Bharat / state

The Kashmir Files : भिवंडीत 'काश्मिर फाईल्स' चित्रपट बंद केल्याच्या विरोधात भाजप आक्रमक - The Kashmir Files

काश्मिर फाईल्स हा चित्रपट ( The Kashmir Files ) भिवंडीतील चित्रपटगृहाच्या मालकाने बंद केल्याच्या विरोधात भाजप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत चित्रपटगृहाच्या मालकाला जाब विचारला. शिवाय चित्रपट पुन्हा सुरू करण्यासाठी निजामपुरा पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. त्यामुळे भिवंडीतील राजकीय वातावरण तापल्याचे पाहवयास मिळाले आहे.

The Kashmir Files
The Kashmir Files
author img

By

Published : Mar 12, 2022, 8:32 PM IST

ठाणे - काश्मिर फाईल्स हा चित्रपट ( The Kashmir Files ) भिवंडीतील चित्रपटगृहाच्या मालकाने बंद केल्याच्या विरोधात भाजप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत चित्रपटगृहाच्या मालकाला जाब विचारला. शिवाय चित्रपट पुन्हा सुरू करण्यासाठी निजामपुरा पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. त्यामुळे भिवंडीतील राजकीय वातावरण तापल्याचे पाहवयास मिळाले आहे.

भिवंडीत 'काश्मिर फाईल्स' चित्रपट बंद केल्याच्या विरोधात भाजप आक्रमक

भाजप कार्यकर्त्यांचा चित्रपटगृहाच्या मालकाला घेराव - भिवंडी शहरातील सिनेमागृहात 'काश्मिर फाईल्स' या सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्यात आल्याने भाजपच्या गोटात तीव्र पडसाद उमटले. कालच (दि. 11 मार्च) प्रदर्शित झालेला हा चित्रपट तांत्रिक अडचणीचे कारण सांगत अर्ध्यात थांबवण्यात आला तर आजपासून हा चित्रपट थेट बंदच करण्यात आला. याची जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उलटल्यानंतर भारतीय जनता पक्ष, बजरंग दलाच्या शिष्टमंडळाने शहर जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी, राजेश कुंटे यांच्या नेतृत्वाखाली चित्रपटगृहाच्या चालकाला सिनेमाचे प्रदर्शन थांबवल्याबाबत जाब विचारला आहे.

'तर' त्यात वावगे काय? - उद्यापासून पुन्हा काश्मिर फाईल्स प्रदर्शित करण्याचे आश्वासन चालकाने दिले, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण यांनी दिली. तसेच चव्हाण यांचे मते कश्मीर पंडिताचा एक प्रकाराचा निषेध केला असून खरा इतिहास समोर आणला जात असेल तर त्यात वावगे काय? काश्मिर फाईल्स सिनेमाच प्रदर्शन थांबण्याचा प्रयत्न झाल्यास याचे गंभीर परिणाम होतील असाही इशारा त्यांनी दिला आहे.

हेही वाचा - Man killed by Father : जमिनीच्या वादातून बापाने केली मुलाची निर्घृण हत्या, हत्येप्रकरणी सख्या बापलेकांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.